शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

इथे नागरिकांना कचरा उचलण्यासाठी दिले जातात पैसे, कचरा उचला मालामाल व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:59 PM

एका अनोख्या स्टार्टअपद्वारे (Israel Unique Start up) लोकांना साफ-सफाईच्या बदल्यात कचरा उचलण्यासाठी व्हर्चुअल मनीची ऑफर (Start up Offers Virtual Clean Coins) दिली जात आहे.

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वस्छता अभियानाबाबत अनेक कँपेन संपूर्ण देशभरात राबवत आहेत. याचदरम्यान इज्राइलमध्येही (Israel) स्वस्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. लोकांनी यामध्ये सामिल व्हावं यासाठी विविध ऑफर्सही दिल्या जात आहेत. एका अनोख्या स्टार्टअपद्वारे (Israel Unique Start up) लोकांना साफ-सफाईच्या बदल्यात कचरा उचलण्यासाठी व्हर्चुअल मनीची ऑफर (Start up Offers Virtual Clean Coins) दिली जात आहे.

एका एलिश्या नावाच्या महिलेने 10 बॅग भरुन क्लिन कॉइन नावाच्या App वर याबाबत अपडेट केलं आणि तिला 10 क्लिन कॉइन मिळाले. अशाप्रकारे लोक कचऱ्याच्या पिशव्या डम्पिंगमध्ये नेण्यापूर्वी ते App वर अपडेट करतात आणि क्लिन कॉइन जमा करतात. या व्हर्चुअल मनीचा उपयोग हे लोक सामान खरेदीसाठी करतात.

Clean Coin App चे को-फाउंडर अ‍ॅडम रॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते फोटो पाहून ओळखतात की कचरा कुठे आहे आणि त्यासाठी किती बॅग लागतील आणि किती क्रेडिट लागेल. त्यांच्या या App वर आतापर्यंत त्यांच्या देशातील 16000 लोकांनी साइन-अप केलं आहे. यापैकी 1200 लोक दररोज कचरा वेचण्याचं काम करतात आणि त्यातून क्लिन कॉइन जमा करतात.

काय आहे क्लिन कॉइन ?कचरा उलल्यानंतर जे क्लिन कॉइन मिळतात ते ट्रॅश कलेक्शन रिवॉर्ड व्हाउचर असतात. याद्वारे कपडे, हॉटेलमध्ये राहण्यासाठी इनडोर क्लाइंबिंगसाठी अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रिडीम केलं जाऊ शकतो. हळू-हळू सुपरमार्केटही या App शी जोडले जात आहेत. वेस्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने लोकांचा या App मध्ये इंटरेस्ट वाढत आहे. एका अंदाजानुसार, एक इज्रायली नागरिक दररोज 1.7 किलोग्रॅम कचरा जमा करतो. इथे प्लॅस्टिकचा मोठा वापर केला जातो. त्यामुळे हा प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असून काही प्रमाणात यात कमी आणण्यासाठी असे उपक्रम राबवले जात आहेत.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके