कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून आपलं कर्तव्य केलं. कधी अन्नदाता तर कधी देवदूत बनून खाकी वर्दीतील देवमाणसांनी लोकांना मदतीचा हात दिला. आता इटली पोलिसांनी एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी लॅम्बोर्गिनी तब्बल २ तास चालवून ५०० किलोटमीटर दूर असलेल्या रुग्णालयात ट्रांसप्लांटसाठी किडनी पोहोचवण्याचं काम केलं आहे. यामुळे रुग्णांचे जीव वाचवण्यात यश आलं असून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव करत कौतुक केलं आहे.
पोलिसांनी ट्विटरवर कॅप्शन दिलं आहे की, आमच्या लॅम्बोर्गिनी @Lamborghini Huracan चे आभार. यामुळेच एका व्यक्तीच्या ट्रांसप्लांटसाठी किडनी वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यात यशं आले. जीव वाचवण्यासाठी सुपरवायजरची नाही तर एकजुटता, तंत्र आणि दक्षतेची आवश्यकता असते. असंही कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
रिअल हिरो! एक पाय नसूनही कुबड्यांच्या साहाय्याने फूटबॉल खेळतोय हा चिमुरडा; पाहा व्हिडीओ
तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता निळ्या, पांढऱ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने डोनर किडनी ठेवली. त्यानंतर जवळपास ५०० किलोमीटर अंतर पार करून २ तासात लॅम्बोर्गिनी त्या ठिकाणी पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे अंतर पार करण्यासाठी जवळपास ६ तासांचा कालावधी लागतो. पण प्रसंगावधान दाखवत हे अंतर कमी वेळात पार केलं आणि रुग्णाचा जीव वाचवला. 'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या बाबांनी फसवणूकीचा आरोप केल्यानंतर यु-ट्यूबरनं दिलं उत्तर; म्हणाला....