ऑस्ट्रेलियामधील एका बीचवरील रेस्टॉरन्टमध्ये एका महिलेला केवळ याकारणाने काढून देण्यात आलं कारण तेथील स्टाफला वाटत होतं की, तिचा ड्रेस रेस्टॉरन्टच्या हिशेबाने ठीक नाही. इटलीला राहणारी मार्टिना कॉरेंडी म्हणाली की, ऑस्ट्रेलियामध्ये बोंडी Beach वर तिच्यासोबत ही घटना झाली. ज्यानंतर तिला फार अपमानजनक वाटलं होतं.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मार्टिना या रेस्टॉरन्टमध्ये एक ग्रे कलरचा क्रॉप टॉप आणि व्हाइट ट्राउजर्स घालून गेली होती. ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत होती जेव्हा रेस्टॉरन्टमधील एका स्टाफ मेंबरने तिला ड्रेसमुळे रेस्टॉरन्टमधून जाण्यास सांगितलं. मार्टिनाने फेसबुकवर पोस्ट लिहिली की, मला याबाबत लोकांची मते जाणून घ्यायची आहेत. कारण या घटनेमुळे मला फार अपमानाचा सामना करावा लागला. सोबतच मला खूप रागही आला. आम्ही या रेस्टॉरन्टमध्ये साइन-इन केलं आणि माझ्या बॉयफ्रेन्डने एक सीट घेतली.
तिने पुढे लिहिले की, जशी तिथे महिला वेटर आली ती मला म्हणाली की, माझा ड्रेस ठीक नाहीये आणि या ड्रेससोबत मला या रेस्टॉरन्टमध्ये बसण्याची परवानगी नाही. मी आणि माझा बॉयफ्रेन्ड ती काय बोलते हे ऐकत होतो आणि आम्हाला तिच्या बोलण्याने चांगलाच धक्का बसला होता. यानंतर या महिलेने आपल्या मॅनेजरला बोलवलं आणि सांगायला सांगितलं की, इथे असा ड्रेस चालणार नाही. मला याचा धक्का बसला की, रेस्टॉरन्टचा मॅनेजरही वेटर महिलेला सहमती देत होता.
मार्टिनाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, कोरोना काळात जिथे जास्तीत जास्त रेस्टॉरन्ट रिकामे आहेत. अशातही तुम्ही मूर्खासारख्या नियमांनी ग्राहकांना बाहेर काढू शकता? मला या प्रकरणावर फक्त लोकांची मते जाणून घ्यायची आहेत. कारण या घटनेनंतर मला काही सुचत नाहीय.
मार्टिनाची ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे आणि या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. लोकांनी रेस्टॉरन्टच्या पॉलिसीवर जोरदार टीका केली आहे. एका व्यक्ती म्हणाली की, कदाचित हे आउटफिट रेस्टॉरन्टसाठी चालत नसेल पण जर बीचवरील रेस्टॉरन्टवर अशा कपड्यांनी काय अडचण असू शकते.