राजस्थानची (Rajasthan News) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटाची एक अनोखी केस समोर आली आहे. लग्नाच्या २१ वर्षानंतर पतीने आपलं जेंडर चेन्ज (Husband Gender Surgery) केलं. याच आधारावर कोर्टाने पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. जोधपूरच्या ४५ वर्षीय पतीने आपली जेंडर सर्जरी केली आणि तो महिला बनला. पत्नीने या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता कोर्टाने या अर्जाला मंजूरी दिली आहे. असं सांगितलं जात आहे की पत्नी पतीपासून काही वर्षापासून वेगळी राहत होती. यावर कोर्टाने सांगितलं की, दोघेही वयस्क आहेत. त्यांना त्यांचं चांगलं वाईट समजतं.
मीडिया रिपोर्टनुसार, २०१७ पासून दोघे पती-पत्नी वेगळे राहत होते. दोघे एकत्र यायला तयार नव्हते. यादरम्यान पतीने जेंडर सर्जरी केली. आता पुन्हा त्यांच्यात पती-पत्नीचं नातं तयार होण्याची आशा नाही. आता दोघांना एकमेकांपासून वेगळं रहायचं आहे. कोर्टाने या गोष्टींचा विचार करून घटस्फोटाला मंजुरीचा आदेश दिला. सूत्रांनी सांगितलं की, हा घटस्फोट दोघांच्याही मर्जीने झाला.
रिपोर्टनुसार, पती जोधरपूर आणि पत्नी जयपूरला राहणारी आहे. दोघांनी २०२१ मध्ये फॅमिली कोर्टात सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ते म्हणाले होते की, लग्नानंतर २०१७ पासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. यादरम्यान पतीने जेंडर चेन्ज केलं. आता त्यांच्यात पती-पत्नीसारखं नातं राहू शकत नाही.
दोघांमध्ये सेटलमेंट झाली आहे आणि त्यात कोणत्याही गोष्टीचा वाद नाही. तसेच ते येणाऱ्या काळात एकमेकांवर कोणतेही दोष लावणार नाहीत. त्यामुळे दोघांनी सहमतीने घटस्फोटाचा अर्ज दिला. आता कोर्टाने पती-पत्नीचा अर्ज मंजूर करत घटस्फोटाचा आदेश जारी केला.