Snake News : जगभरात अशा काही अजब घटना घडत असतात ज्यावर सहजपणे विश्वास बसत नाही. एका क्षणी व्यक्ती मृत्यूच्या दारातून परत येतो तर दुसऱ्या क्षणी त्याचा जीव जातो. अशीच एक घटना राजस्थानच्या जैसलमेरमधून समोर आली आहे. ज्याबाबत वाचून तुम्हीही हैराण व्हाल. इथे एका व्यक्तीला एकाच सापाने सहा दिवसाच्या आत दोन वेळ दंश मारला. पहिल्यांदा जेव्हा सापाने दंश मारला तेव्हा तर व्यक्तीचा जीव वाचला. पण दुसऱ्यांदा तो वाचू शकला नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जैसलमेरच्या फलसूंडमध्ये ही अजब घटना घडली. मेहरानगढ गावाच्या करमावलीच्या ढाणी जासब खानला साधारण एक आठवड्याआधी सापाने दंश मारला होता. पोखरणमध्ये चार दिवस उपचार केल्यावर घरी परतला तेव्हा जणू साप त्याची वाटच बघत होता. घरी परतल्यावर एक दिवसांनंतर सापाने त्याला पुन्हा दंश मारला. पुन्हा त्याला उपचारासाठी जोधपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृतकाचे नातेवाईक रईस खान यांनी माहिती दिली की, 20 जून रोजी जोसब खान याला वाळवंटात आढळणाऱ्या सापाने पायावर दंश मारला होता. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 4 दिवस उपचारानंतर त्याला सुट्टी मिळाली. पण एक दिवसांनंतर 26 जून रोजी त्याच सापाने घरात फिरत असताना जोसब खानला दुसऱ्यांदा पायावर दंश मारला. ज्यामुळे त्याची स्थिती गंभीर झाली होती. कारण आधीचंच विष पूर्णपणे शरीरातून उतरलेलं नव्हतं.
भणियाना बॉर्डर भागात असलेल्या ढाणीमध्ये घडलेल्या या घटनेची चौकशी पोलीस करत आहेत. पोलिसांनी याबाबत सांगितलं की, 44 वर्षीय जासब खान याला 20 जून रोजी सापाने दंश मारला होता. त्याच्यावर पोखरणमध्ये चार दिवस उपचार सुरू होते. जिथे त्याचा जीव वाचला.
हॉस्पिटलमधून घरी आल्यावर 26 जून रोजी त्याच सापाने त्याला पुन्हा दंश मारला. कुटुंबिय त्याला पुन्हा पोखरण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तब्येत जास्त बिघडल्याने त्याला जोधपूरला नेण्यात आलं होतं. इथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.