शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

२४००० वेळा केला ७१ वर्षीय व्यक्तीने कस्टमर केअरला फोन, पोलिसांनी उचलून नेलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 4:08 PM

वेगवेगळ्या कंपन्या आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी टोल फ्री क्रमांक देतात. यावरून त्यांच्या तक्रारी ऐकल्या जातात आणि त्यांना सेवांबाबत माहिती दिली जाते.

(Image Credit : wayhang.com)

वेगवेगळ्या कंपन्या आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी टोल फ्री क्रमांक देतात. यावरून त्यांच्या तक्रारी ऐकल्या जातात आणि त्यांना सेवांबाबत माहिती दिली जाते. पण एका टेलिकॉम कंपनीसाठी एक व्यक्ती चांगलीच त्रासदायक ठरली. ७१ वर्षीय एका आजोबांनी कंपनीला २४ हजार वेळा फोन केला. आता त्यांची अडचण काय होती हे तर माहीत नाही. पण कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस या आजोबांना उचलून घेऊन गेले.

ही घटना जपानमधील. एकिटोशी ओकमोटो नावाची ही व्यक्ती रिटायर्ड आहे. ते सैतामामध्ये राहतात. त्यांना पोलिसांनी व्यापारात अडसर निर्माण करण्याच्या कारणावरून अटक केली. त्यांच्यावर आरोप आहे की, गेल्या दोन वर्षात एका टेलिकॉन कंपनीला त्यांनी २४ हजार वेळा फोन केला. ते कंपनीच्या सर्व्हिसबाबत हैराण होते आणि सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून माफीची मागणी करत होते.

एका आठवड्यात ४११ वेळा फोन

ऑक्टोबर महिन्यात केवळ एका आठवड्यात एकिटोशी यांनी टोल फ्री नंबरवर ४११ वेळा फोन केला. ते सतत रेडिओ ब्रॉडकास्ट सर्व्हिसचा वापर करू शकत नसल्याची तक्रार करत होते. टेलिकॉम कंपनी KDDI ला आढळून आलं की, आजोबांनी त्यांना २४ हजार वेळा फोन केला. कंपनीच्या रेकॉर्डनुसार, एकिटोशी दर दिवशी कमीत कमी ३३ वेळा फोन करत होते. कंपनीने आधी दुर्लक्ष केलं नंतर पोलिसात तक्रार दिली.

कंपनी काय म्हणाली?

कंपनीने यावर सांगितले की, त्यांच्या सतत फोन करण्याने कंपनीचे कर्मचारी दुसऱ्या ग्राहकांचे फोन घेऊ शकत नव्हते. जपानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकिटोशी पुन्हा पुन्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन करून म्हणत होते की, 'माझ्याकडे या आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन करण्याची व चुकीच्या पद्धतीने व्यापार करत असल्याची माफी मागा'. आता पोलिसांनी त्यांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

दुसरीकडे ७१ वर्षीय एकिटोशी यांचं म्हणणं आहे की, ते या केसमध्ये पीडित आहेत आणि कारवाई कंपनीवर व्हायला पाहिजे. सोशल मीडियात यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. काही लोक कंपनीच्या कारवाईचं समर्थन करत आहेत तर काही लोक एकिटोशी यांची बाजू घेत आहे.

टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटके