जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. काही आश्चर्यकारक असतात तर काही विचित्र असतात. पण याबाबत लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता बघायला मिळते. असाच एक उत्सव जपानमध्ये दरवर्षी साजरा केला जातो. दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या शनिवारी हा उत्सव साजरा केला जातो. याचं नाव आहे मत्सुरी. याला नेकेड फेस्टिव्हल म्हणूनही ओळखलं जातं. यात लोक कमीत कमी कपडे घालतात.
हा उत्सव जपानमधील ओकायामा शहरातील सैदाइजी कान्नोनीन मंदिरात साजरा केला जातो. इथे येऊन लोक पूजा करतात. यावर्षी सुद्धा हा फेस्टिव्हल गेल्या १५ तारखेला साजरा झाला.
या उत्सवात लोकांना अंगावर छोटासा कपडा बांधावा लागतो. याला फुंदेशी असं म्हटलं जातं. पांढऱ्या रंगाच्या सॉक्सना तबी असं म्हटलं जातं. म्हणजे लोकांच्या अंगावर केवळ लंगोटसारखा एक कापड आणि पायात सॉक्स असतात.
आश्चर्याची बाब म्हणजे हा उत्सव केवळ ३० मिनिटांसाठीच चालतो. एका जागेवर १० हजार लोकांवरून झेंडे फेकले जातात. जे लोक हे झेंडे छेलतील त्यांचं वर्ष चांगलं जाणार अशी मान्यता आहे.
यादरम्यान अनेकजण जखमीही होतात. या उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून लोक एकत्र आलेले असतात. जेणेकरून त्यांचं वर्ष चांगलं जावं.