वेगवेगळ्या देशांमध्ये देवांबाबत वेगवेगळ्या मान्यता मानल्या जातात. पण जपानमधून एक अजबच घटना समोर आली आहे. इथे हजारो लोक कपडे न घालता एका मंदिरात पोहोचले होते. हे मंदिर 1250 वर्ष जुनं आहे. हिवाळ्यात हजारो लोक या पाण्यातून जातात. या गोष्टीला पवित्र मानलं जातं.
हाडीका-मात्सुरी हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारीमध्ये साजरा केला जातो. यामागे कारण आहे की, जपानमध्ये तरूणांची संख्या कमी होत आहे. ज्यामुळे उत्सवांचां भार वृद्ध लोकांवर येत आहे.
याला नेकेड मॅन फेस्टिव्हल असंही म्हटलं जातं. या उत्सवात सहभागी लोकांना केवळ लंगोट घालायची असते. हा उत्सव जपानच्या दक्षिण भागातील होन्शू आयलॅंडवर साजरा केला जातो. इथे एक सैदायजी केनोनिन मंदिर आहे. उत्सवाची सुरूवात महिलांच्या नृत्याने होते. सायंकाळी लोक मंदिराला फेऱ्या मारतात.
रात्री पुजारी मंदिराच्या खिडकीतून काही फेकतात. त्या ज्यांच्या हाती लागेल ते नशीबवान मानले जातात. मान्यता आहे की, हे त्यांच्यासाठी शुभ असतं. मंदिरात येणाऱ्या लोकांना गॉड मॅनला स्पर्श करायचा असतो. या उत्सवात देशभरातून हजारो लोक येतात. जपानमधील लोकसंख्या वेगाने कमी होत आहे.
ज्यामुळे तरूणांची संख्या कमी आहे. मंदिरातील भिक्षु दायगो फुजिनामी म्हणाले की, 'या मोठ्या उत्सवाचं आयोजन करणं अवघड आहे. तुम्ही बघू शकता की, आज काय झालं. इतके लोक इथे आहेत आणि रोमांचक आहे. पण पडद्यामागे फार रितीरिवाज आणि काम असतात. जे करावे लागतात. मी याकडे तोंड फिरवू शकत नाही'.