ही घटना जपानमधील आहे. येथे एका 'महिलेला' पाण्यात बुडताना पाहून कुणी तर थेट इमरजन्सी सर्व्हिसला फोन केला. यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यांनी जेव्हा या ‘बुडणाऱ्या महिलेला’ पाण्याबाहेर काढले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण ती काही खरो खरची महिला नव्हती, तर रबराची एक सेक्स डॉल होती. मात्र, ही डॉल पाण्यात नेमकी कुणी फेकली? यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. (Japan Rescuers of drowning woman from water turns out to be a sex doll)
काय आहे नेमकं प्रकरण?
soranews24 ने दिलेल्या वृत्तानुसार, जपानी यूट्यूबर Tanaka Natsuki त्यावेळी चित्रिकरण करत होती. यावेळी त्यांना पाण्यात ‘मृतदेहा’ प्रमाणे काही दिसले. यानंतर पोलीस, फायर फाइटर्स आणि पॅरामेडिक्स घटनास्थळी दाखल झाले. जोवर ती गोष्ट पाण्यातून बाहेर काढण्यात आली नाही, तोवर Tanaka Natsuki ला वाटत होते, की ती एक महिला आहे. मात्र, नंतर त्यांना समजले, की ती महिला नसून एक ‘डच वाइफ’ म्हणून ओळखली जाणारी रबराची सेक्स डॉल आहे.
यासंदर्भात Tanaka Natsuki ने लिहिले, की ‘मी जेव्हा माझा फिशिंग व्हिडिओचे चित्रिकरण करत होते, तेव्हा मला वाटले, की एखादा मृतदेह तरंगत आला आहे. मात्र, ती एक ‘डच वाइफ’ निघाली. असे वाटते, की कुणाचा गैरसमज झाला आणि त्याने अधिकाऱ्यांना फोन केला. यामुळेच पोलीस, फायर ट्रक आणि अॅम्ब्यूलन्स घटनास्थळी पोहोचली.