जगातील अनेक गोष्टींना नेहमी शापित म्हटलं जातं. यात खास डॉलपासून ते काही पेंटिंग व पुस्तकांचाही समावेश आहे. या वस्तू जवळ ठेवणाऱ्या लोकांसोबत काही घटना घडतात किंवा त्यांच्या निधनाच्या गोष्टीही समोर आल्या. त्यानंतर या वस्तूंना शापित ठरवण्यात आलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कवितेबाबत सांगणार आहोत. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर लगेच लिहिण्यात आलेली एक अॅंटी वॉर कविता 'टॉमिनोज हेल'बाबत असंच म्हटलं जातं. असं मानलं जातं की, जे कुणी ही कविता वाचतील त्यांचं कोणत्या ना कोणत्या कारणाने निधन होतं.
जंपर्स जंपचे पॉडकास्टर गेविन रूटा आणि कार्लोस जुईको यांनी सांगितलं की, 'ही कविता वाचल्यामुळे इतक्या दुर्घटना घडल्या की, लोक मानू लागले की, ही कविता वाचण्याचा प्रयत्न करणारे मरण पावतात. त्यांनी दावा केला की, 1974 मधील सिनेमा पास्टरल, टू डाय इन द कंट्रीसाइडचे दिग्दर्शक तेरायामा शुजीचा सिनेमा रिलीजच्या एक आठवड्यानंतर मृत्यू झाला. हिट ठरलेला हा सिनेमा टॉमिने हेलवर आधारित होता.
गेविन म्हणाले की, त्याचप्रमाणे एका कॉलेजमधील तरूणीला तिच्या मित्राने चॅलेंज केलं होतं आणि म्हणाला होता की, तू ही कविता जोरात ऐकव. तिने हे केलं, पण याच्या एक आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला.
एक जपानी लेखक आणि कवी यामोता इनुहिको यांनी 2004 मध्ये आलेल्या त्यांच्या 'कोकोरो वा कोरोगारू इशी नो यू न' या पुस्तकात याबाबत लिहिलं होतं की, 'जर तुम्ही टोमिनोज हेल कविता जोरात वाचली तर भयानक दुर्घटनेपासून वाचू शकणार नाही'.
टोमिनोच्या भयावह थेअरीबाबत काही लोक म्हणाले की, याचा लेखक सैजो यासोने पहिल्यांदा 1919 मधील आपलं पुस्तक साकिनमध्ये ही कविता छापली होती आणि तो स्वत: या कथित शापित कवितेचा पहिला शिकार होता. पण मुळात कवीची शापित कविता प्रकाशित होण्याच्या अनेक वर्षानी म्हणजे 1970 मध्ये त्याचं निधन झालं. अशात दावा किती सत्य आहे हे सांगता येत नाही.
कविता खरंच शापित आहे की नाही या दाव्याबाबत काही ठोस सांगता येत नाही. कारण यूट्यूबवर कवितेचे अनेक व्हिडीओ आहेत आणि ती वाचणारे जास्तीत जास्त लोक जिवंत आहेत. पण कवितेमध्ये सैजोचे शब्द नक्कीच भयावह आणि परेशान करणारे आहेत. यात लिहिलं आहे की, 'मोठी बहीण रक्ताची उलटी करते, लहान बहीण आग ओकते. तर त्याहून लहान बहीण टोमिनो केवळ दागिने ओकते. टोमिनो एकटीच अशा नरकात पडते जिथे अंधकार आहे, जिथे फुलंही नाहीत'.