The companionship Business: जपानची राजधानी टोक्योमध्ये एक असा व्यक्ती आहे, ज्याच्याकडे काहीही काम नाही, तो काहीच करत नाही. परंतु त्याला काहीही न केल्याबद्दल भरपूर पैसे मिळतात. तो त्याच्या 'काहीही न करण्याच्या' व्यवसायाचा पूर्णपणे आनंद घेतो. शोजी मोरिमोटो असे या व्यक्तीचे नाव असून तो सध्या जपानमध्ये दर तासाच्या हिशोबाने सेवा देतो.
मोरिमोटोला त्याचे बरेचसे काम सोशल मीडियाद्वारे मिळते. ट्विटरवर त्यांचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शोजी मोरिमोटोला फक्त लोकांजवळ बसण्यासाठी पैसे मिळतात. लोक त्यांना स्वतःकडे बोलावतात आणि काही काळ सोबत थांबण्यास सांगतात. त्या बदल्यात ते शोजीला मोठी रक्कम देतात. काहीही न करण्याचा अर्थ असा नाही की मोरीमोटोकडून काहीही करून घेतले जाईल.
“मी स्वत:ला भाड्याने देतो. ज्या ठिकाणी समोरची व्यक्ती जाईल तिकडे जाणे, त्यांच्यासोबत राहणे हे माझे काम आहे. त्या दरम्यान माझे काही काम नसते,” असे त्याने सांगितले. गेल्या ४ वर्षांमध्ये त्याने ४ हजार सेशन्स केली आहेत. ३८ वर्षीय शोजी मोरिमोटो प्रत्येक तासासाठी १० हजार जपानी येन म्हणजेच जवळपा ५६०० रूपये घेतो.
एका दिवसात दोन जणांना सेवासध्या मोरिमोटोचा उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. परंतु आपण किती कमावतो याची माहिती त्याने दिली नाही. एका दिवसामध्ये जवळपास तो २ ग्राहकांसोबत राहतो. महासाथीपूर्वी तो दिवसाला ३-४ लोकांना सेवा देत होता. अनेक जण त्याचं कौतुकही करतात. असाही एक ग्राहक आहे ज्याने त्याला आतापर्यंत २७० वेळा बोलावले आहे.