मुंबई : तुम्ही जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तर तिथे बॉलिवूडची (bollywood) सुपरहिट गाणी ऐकायला नक्कीच मिळतील. बॉलिवूडच्या गाण्याचे म्युझिकच असे आहे की प्रत्येकाचे पाय त्यावर थिरकायला लागतात. त्यामुळे जपान (Japan ) देशातील तरुणीही बॉलीवुडच्या गाण्यावर स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात जपानी डान्सर भारतीय गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये रईस (raees) चित्रपटाच्या गाण्यावर जपानी मुली डान्स करताना दिसत आहेत. या मुली अतिशय अगदी भारतीय पद्धतीने (indian) गरबा स्टेप्स करताना दिसतायेत. त्यांचे डान्स मुव्ह्स पाहुन त्या जणू भारतीयच वाटत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा डान्स व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. एका युजर्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे की, बॉलिवूडची क्रेझ फक्त भारतात नाहीतर जगभरामध्ये आहे. या व्हिडीओमध्ये डान्स करत असलेल्या मुलींची नावे अयाका आणि ची आहे.
या दोघींही जपानी डान्सर असून टोकियोमध्ये फिटनेस स्कूल चालवतात. त्यांचे 6.4k फॉलोअर्स असलेले एक यूट्यूब चॅनेल आहे. बऱ्याचदा त्या बॉलिवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स करून व्हिडीओ शेअर करतात. आयका आणि ची यांनी इतर अनेक भारतीय गाण्यांवर अप्रतिम नृत्य केले आहे.