कपलमध्ये भांडण होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पती-पत्नीमध्ये विविध कारणांमुळे नेहमीच वाद होत असतात. पण ते पुन्हा सगळं विसरून आनंदाने जगू लागतात. एक हैराण करणारी गोष्ट आता समोर आली आहे. एका छोट्याशा भांडणानंतर एक कपल एक दोन वर्षे नव्हे तर तब्बल 20 वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतं. यामध्ये पती पत्नीवर इतका नाराज होता की, एकत्र राहत असूनही त्याने तिच्याशी कधीही काहीही न बोलण्याची शपथ घेतली होती.
जपानमधील पती-पत्नी ओटौ काटायामा आणि युमी 20 वर्षांपासून एका विचित्र नात्यात राहत होते. ओटो युमीशी 20 वर्षे एक शब्दही बोलला नाही. ते तीन मुलांचे पालक होते आणि त्यांचं चांगलं संगोपन करत होते. एके दिवशी त्यांच्या मुलाने होक्काइडो टीव्हीला एक मेल लिहून ही बाब सांगितली आणि त्यांना ते ठीक करण्यासही सांगितले. तिने तिच्या आईला नेहमीच एकटं आणि दुःखी पाहिं आहे कारण तिचे वडील तिच्याशी 20 वर्षांपासून बोलत नाहीत. टीव्ही शोने हे आव्हान म्हणून स्वीकारलं आणि जोडप्याला बोलण्यासाठी बोलावलं.
जेव्हा ओटोला विचारलं की, तू तुझ्या बायकोशी का बोलत नाहीस? त्याने उत्तर दिलं की - मी यूमीवर रागावलो आहे कारण ती फक्त आमच्या मुलांकडे लक्ष देते आणि माझी सर्वात कमी काळजी घेते. ओटोने आपला राग चुकीचा असल्याचं म्हटलं. क्रूने ओटोला एक व्हिडीओ दाखवला ज्यामध्ये युमी त्याला विचारत होती - तुझं वय किती आहे? तुझ्या आवडीचा खाद्यपदार्थ कोणता? तुझा आवडता रंग कोणता आहे? आता मी तुम्हाला माझ्या भावना सांगतो. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी नारा पार्कमध्ये वाट पाहत आहे. तू येणार आहेस का?
यानंतर कपल पार्कमध्ये भेटले आणि त्यांची मुले त्यांना दुरूनच गुपचूप पाहत होते आणि त्यांचं संभाषण ऐकत होते. ओटो आपल्या पत्नीला म्हणाले की, 'आपण बोललो त्याला खूप दिवस झाले. तुला मुलांची खूप काळजी होती. युमी, तू आत्तापर्यंत खूप त्रास सहन केला आहेस. मी प्रत्येक गोष्टीसाठी तुझा आभारी आहे. यानंतरही मला बोलायचे आहे. मला आशा आहे की आम्ही येथून सर्वकाही ठीक करू शकू. दोघेही रडू लागले आणि हे सर्व पाहून त्यांची मुलेही भावूक होऊन रडू लागली.