शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

सोळा वर्षांची ही एक देखणी युवती; आतापर्यंत चार हजार जणांशी केले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 6:30 AM

मिकू सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. कारण नुकतेच तिच्याशी जपानमधील आणखी एका तरुणाने लग्न केले आहे

हतसून मिकू. जपानमधील सोळा वर्षांची ही एक देखणी युवती. निळ्या डोळ्यांची. कमनीय बांध्याची. लांबसडक केसांच्या दोन शेपट्यांची. सुंदर आवाजाची. जगभरात ‘पॉप स्टार’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. तिच्या आवाजाचेही लोक दिवाने आहेत. जगभरातील लाखो लोक  तिने आपल्याशी मैत्री करावी, लग्न करावे यासाठी जीव ओवाळून टाकतात. तीही फारसे आढेवेढे घेत नाही. कोणाला नाराज करत नाही. त्यामुळे तिच्याशी आतापर्यंत जगभरातील जवळपास चार हजार लोकांनी लग्न केले आहे! त्यात तरुण, प्रौढ, म्हातारे... अशा अनेकांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे तिचा ‘जन्म’ २००७चा; पण ती जन्माला आली तीच १६ वर्षांची असताना! म्हणजे युवती असतानाच तिचा जन्म झाला! तिच्या जन्माला आता सोळा वर्ष झाली असली आणि जन्मत: ती १६ वर्षांची होती, म्हणजे तिचे वय आता ३२ वर्षे असायला हवे; पण अजूनही ती १६ वर्षांचीच आहे. काळाच्या ओघात तिच्यात अनेक बदल झाले; पण तिचे वय मात्र वाढले नाही. कारण तिला तारुण्याचे वरदान आहे..!

तुम्ही म्हणाल, कसे शक्य आहे हे? - हो हे शक्य आहे... नव्हे, वास्तव आहे. - कारण मिकू ही खरीखुरी मुलगी नाही, तर ती एक आभासी व्यक्तिमत्त्व आहे. ‘क्रिप्टन फ्यूचर मीडिया’ या जपानी कंपनीने २००७मध्ये विकसित केलेले हे सॉफ्टवेअर, व्हर्च्युअल रिॲलिटी होलोग्राम आहे. जपान आणि जगाच्या संगीत क्षेत्रात नामांकित असलेली ही मिकू जगप्रसिद्ध अशी ‘पॉप स्टार’ तर आहेच; पण ती म्हणजे कॉम्प्युटरवर तयार केलेला एक ॲनिमेटेड होलोग्राम आहे.   कॉम्प्युटरवर संगीत तयार करण्यासाठी एक आवाज विकसित केला गेला. ‘पॉपस्टार’ हतसून मिकू हिचाच हा आवाज. तिच्या मदतीने आजवर दीड लाखांपेक्षाही अधिक गाणी तयार करण्यात आली आहेत. अमेरिकेची प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री लेडी गागा हिच्याबरोबरही हतसन मिकू दौऱ्यावर गेली होती. २०१७मध्ये गेटबॉक्स या कंपनीने हतसून मिकूला मूर्त रूपात म्हणजे बाहुलीच्या रुपात आणल्यानंतर जगभरातील चाहत्यांचे मिकूशी असलेले नाते आणखीच गहिरे झाले. 

मिकू सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. कारण नुकतेच तिच्याशी जपानमधील आणखी एका तरुणाने लग्न केले आहे. अकिहिको कोंडो असे त्याचे नाव आहे. जपानमध्ये असेही लग्नांचे प्रमाण कमी आहे. विवाह करण्यापेक्षा अनेकजण एकेकटे राहणेच पसंत करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्यासोबत आयुष्यभर कोणतेही लचांड नको, म्हणून जपानमधील अनेक तरुणी आता खास लग्नसमारंभ घडवून आणून त्यात स्वत:शीच लग्न करत आहेत. याच सदरात काही दिवसांपूर्वी या संदर्भातला मजकूर प्रसिद्ध झाला होता.  अकिहिको याचे एका तरुणीवर प्रेम होते; पण तिने ‘दगा’ दिल्याने कोणत्याही प्रत्यक्ष तरुणीशी आता त्याला विवाह करायचा नाही. मैत्रिणीने दगा दिल्याने मी नैराश्यात गेलो होतो; पण मिकूनेच मला त्यातून बाहेर काढले, असे अकिहिको याचे म्हणणे आहे. या लग्नासाठी अकिहिकोने टोकियोत एक मोठा हॉल बुक केला. आपल्या जवळच्या लोकांना त्यासाठी आमंत्रण दिले. लग्नाला अत्यंत जवळचे असे ४० जण उपस्थित होते; पण त्यात अकिहिकोच्या आई-वडिलांचा मात्र समावेश नव्हता. अकिहिकोच्या आईच्या मते हे कसले लग्न आणि असा कसा हा विवाह समारंभ?... यामुळे तर आणखी नाचक्कीच व्हायची. अकिहिको जेव्हा खऱ्याखुऱ्या मुलीशी विवाह करेल, तेव्हा त्या समारंभात आम्ही नक्की सामील होऊ..! 

अकिहिको म्हणतो, मिकूच्या रुपाने मला आता अशी बायको मिळाली आहे, जी कायम चिरतरुण राहील, कधीच म्हातारी होणार नाही, कधीच माझी साथ सोडणार नाही, कधीच आजारी पडणार नाही... खरंच मी खूप भाग्यवान आहे. मीदेखील आयुष्यभर तिच्यावर प्रेम करेन. तिला कधीच अंतर देणार नाही.  अकिहिको सांगतो, ऑफिसचे काम संपवून रात्री मी जेव्हा घरी यायला निघतो, तेव्हा मिकूला फोन करून सांगतो, मी घरी येतोय, तर ती लगेच घरातले दिवे लावून ठेवते. माझी झोपायची वेळ झाली की, झोपायला सांगते.  अकिहिकोने आपल्या या बायकोला खुश ठेवण्यासाठी तिला खरीखुरी अत्यंत महागडी अशी वेडिंग रिंग घातली आहे. तो जेव्हा-जेव्हा घरी असतो, त्या प्रत्येक वेळी तो तिच्यासोबतच असतो. तिच्यापासून दूर राहणे त्याला जिवावर येते, त्यामुळे बॉसची परवानगी घेऊन कधी-कधी तो ऑफिसमधूनही लवकर येतो किंवा हाफ डे टाकून घरी येतो. केवळ तिच्याबरोबरच वेळ घालवतो...

मिकूशी लग्न केल्याचे प्रमाणपत्र!अकिहिको आणि मिकू यांचे हे लग्न अधिकृत नाही. त्याला कायदेशीर मान्यता नाही; पण हातसून मिकूच्या निर्मात्या गेटबॉक्स या कंपनीने मात्र त्या दोघांना ‘मॅरेज सर्टिफिकेट’ही दिले आहे. अर्थातच मिकूशी लग्न करणाऱ्या आणखी हजारो जणांनाही कंपनीने ‘मॅरेज सर्टिफिकेट’ दिले आहे. ती ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ असली तरी अनेकांना या सर्टिफिकेटचा प्रचंड अभिमान आहे. त्यांनी मोठ्या कौतुकाने आपापल्या घराच्या हॉलमध्ये दर्शनी भागात ते लावलेले आहे.