ट्विटरवर अनेक जण ट्विट करून विविध घडामोडींची माहिती देत असतात. दिग्गज व्यक्तींनाही फॉलो करता येतं. तसेच त्यांचं ट्विट हे रिट्विट करता येतं. मात्र ट्विटरवर फॉलो केल्यास पैसे मिळतील असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका अब्जाधीशाने ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. युसाकू मीजावा असं जपानमधील अब्जाधीशाचं नाव असून त्यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना 64 कोटी मिळणार आहेत.
43 वर्षीय मीजावा यांचे ट्विटरवर 6.8 मिलियन फॉलोअर्स आहे. 2010 मध्ये त्यांनी ट्विटरवर अकाऊंट सुरू केलं. मीजावा यांच्याकडे 2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. आपल्याकडे पैसे वाटण्यासाठी रिकामा वेळ आहे. कोणतंही काम न करता एक ठराविक रक्कम मिळाली तर त्याला बेसिक इनकम म्हणता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. मीजावा यांनी नववर्षात पहिलं ट्विट केलं होतं. ज्या फॉलोअर्सनी त्यांचं ते ट्विट रिट्विट केलं आहे अशा 1 हजार लोकांना 64 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
उद्योगपती युसाकू मीजावा हे चंद्राला गवसणी घालणारे जगातले पहिले सर्वसामान्य व्यक्ती देखील ठरणार आहेत. ते स्टारशिप रॉकेटच्या माध्यमातून हा कारनामा करणार आहे. त्यांची ही अद्भूत ट्रिप 2023 मध्ये प्लॅन करण्यात आली असून या अनोख्या ट्रिपसाठी त्यांना एक महिला लाइफ-पार्टनरचा शोध आहे. युसाकू यांनी सोशल मीडियातून आवाहन केलं आहे की, त्यांना हा अनुभव स्पेशल महिलेसोबत शेअर करायचा आहे. काही दिवसांपूर्वीच 44 वर्षीय युसाकू यांचं 27 वर्षीय अभिनेत्री अयामेसोबत ब्रेकअप झालं. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या या प्लॅन्ड ट्रिपच्या निमित्ताने महिलांना लाइफ पार्टनरसाठी अप्लाय करण्याचं आवाहन केलं आहे.
युसाकू यांनी त्यांच्या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली असून वेबसाइटवर अटींची यादीही दिली आहे. सोबतच तीन महिन्यांची अर्ज करण्याची लांबलचक प्रक्रियाही सांगितली आहे. त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, अर्ज करणाऱ्या महिला सिंगल आणि 20 च्यावर त्यांचं वय असावं. त्यांचे विचार सकारात्मक असावेत आणि स्पेसमध्ये जाण्याची आवडही असावी. या वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी 17 जानेवारी ही शेवटची तारीख असेल. तर पार्टनरची निवड मार्चच्या शेवटच्या महिन्यात केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा
'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना
संतप्त शिवप्रेमींच्या तीव्र निदर्शनानंतर ‘आज के शिवाजी’ पुस्तक घेतले मागे
मोदी-शाह-डोवालांच्या फोटोंवर क्रॉस, प्रज्ञा सिंह ठाकूरांना मिळाले संशयित पत्र