शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य प्रचारसभा, घाेषणांनी दुमदुमले हाेते. मात्र, या राज्यात एक गाव या काेलाहलापासून लांब हाेते. हे गाव एका अर्थाने खूप वेगळे आहे. या गावातील महिला दाेन किंवा दाेनपेक्षा जास्त पुरुषांसाेबत विवाह करते. सर्व पतींसाेबत महिला एकाच घरात राहते. अशाप्रकारची परंपरा असलेल्या या गावाचे नाव आहे छितकुल. महाभारतामुळे गावात ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते. छितकुल हे दिल्लीपासून सुमारे ६०२ किलाेमीटर अंतरावर आहे. गाव अतिशय दुर्गम भागात आहे. हिवाळा सुरू हाेताच तेथे बर्फवृष्टी हाेते आणि आजूबाजूचा परिसर एका वेगळ्याच साैंदर्याने नटून जाताे. चीन-तिबेट सीमेला लागून असलेले छितकुल हे या भागात भारताचे अखेरचे गाव आहे. तेथे ४७१ मतदार आहेत. प्रत्यक्ष ताबा रेषा तेथून ६० किलोमीटर अंतरावर आहे.
वेगळ्या परंपराछितकुलमधील परंपरा इतर भागांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. तेथे हिंदू विवाह कायदा आणि उत्तराधिकारी कायदा लागू हाेत नाही. महिला ४ पुरुषांसाेबत विवाह करू शकते. बहुतांश वेळा एकाच कुटुंबातील २ किंवा ४ भावांसाेबत लग्न करते. ती सर्व पतींसाेबत एकाच घरात राहते.
बहुपती परंपरेचे पालन हाेते कसे?nएखादा भाऊ पत्नीसाेबत खाेलीत असेल तर ताे दरवाजाबाहेर आपली टाेपी ठेवताे. हा एक संकेत आहे. अशावेळी इतर पती खाेलीत जात नाहीत. गावात हुंडाबंदी आहे. विवाहित मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क राहात नाही. nमहाभारत काळात पांडव अज्ञातवासात असताना या गावात आले हाेते. काही काळ त्यांनी एका गुहेत वास्तव्य केले हाेते. त्यांना पाहून स्थानिकांनीही बहुपती परंपरा स्वीकारली. शेवटचा ढाबा, दाेन बसगावात दिवसातून दाेनच बस येतात. एक चंडीगड तर दुसरी रिकांग पिओ येथे जाते.देशाच्या काेपऱ्यातील अखेरचे पाेस्ट ऑफिस येथे आहे. केवळ २ कर्मचारी कामावर आहेत. १५ वर्षांपूर्वी अखेरचे पत्र पाेस्ट ऑफिसात आले हाेते. इयत्ता दहावीपर्यंत शाळा आहे. एकच शिक्षक असून, २१ विद्यार्थ्यांना तेच सर्व विषय शिकवतात. शेवटचा ढाबा आहे. ताे एखादा टुरिस्ट स्पाॅट बनला आहे. देशातील सर्वात स्वच्छ हवा छितकुल येथे आहे.