शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

jara Hatke: एकाच घरात आठ बायका, ‘कहाणी’ ऐका..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 5:38 AM

jara Hatke: एका माणसाला दोन बायका असल्या, तर त्याची कशी फजिती होते, याचं चित्रण या चित्रपट, नाटकांमध्ये केलं आहे; पण एकाच माणसाला एकाच वेळी एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल आठ बायका असतील आणि त्याही नवऱ्याबरोबर एकाच घरात राहत असतील तर?

‘दोन बायका, फजिती ऐका’ ही म्हण आपल्या सर्वांनाच माहीत आहे. याच विषयावर आणि याच नावानं चित्रपट, नाटकंही येऊन गेली आहेत. एका माणसाला दोन बायका असल्या, तर त्याची कशी फजिती होते, याचं चित्रण या चित्रपट, नाटकांमध्ये केलं आहे; पण एकाच माणसाला एकाच वेळी एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल आठ बायका असतील आणि त्याही नवऱ्याबरोबर एकाच घरात राहत असतील तर? भांड्याला किती भांडी वाजत असणार? ही ‘वाजणारी’ भांडी चवीनं ऐकायला आणि पाहायला आजूबाजूचे किती लोक येत असतील. त्यांची कशी फुकटात मस्त करमणूक होत असेल, याचे अंदाज बांधायला एव्हाना तुम्ही सुरूही केलं असेल.अशाच एका ‘कलाकारा’ची कहाणी सध्या जगभरात व्हायरल होते आहे. हा ‘कलाकार’ आहे थायलंडचा. तो खरोखरच कलाकार म्हणजे टॅटू आर्टिस्ट आहे; पण सध्या तो फेमस आहे, ते त्याच्या कलेमुळे नाही, तर त्याच्या बायकांमुळे! या तरुण कलाकाराचं नाव आहे ओंग डेम सरवत आणि त्याला आठ बायका आहेत. मुख्य म्हणजे हे सगळे एकाच घरात ‘आनंदानं’ राहतात. त्याच्या घरात चार खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीत दोन बायका! आश्चर्याची गोष्ट म्हणजे असं असूनही अजून एकदाही तिथे ‘भांडी वाजलेली नाहीत’! अर्थात हे म्हणणं आहे ओंग डेम आणि त्याच्या बायकांचं! एकाच घरात आठ बायका राहत असूनही ते सारे गुण्यागोविंदाने नांदतात आणि त्या घरातला आवाज अगदी शेजारच्या घरातही ऐकू जात नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आपण’ असताना आपल्या नवऱ्यानं आणखी दुसरी बायको केली, म्हणून नवऱ्याच्या नावानं त्या बोटंही मोडत नाहीत. उलट ‘आणखी’ लग्न करण्यासाठी या बायकांनीच ओंगला मान्यता दिली आहे! हे ‘आश्चर्य’ इथेच संपत नाही. ओंगच्या आठही तरुण बायका सांगतात, ‘माझा नवरा जगातला सर्वोत्तम पुरुष आहे!’ गेल्याच आठवड्यात ओंग आणि त्याच्या आठही बायकांची थायलंडमधील एका कॉमेडी टीव्ही शोमध्ये मुलाखत झाली. या कार्यक्रमात ओंगनं आपल्या आठही बायकांची कहाणी सांगताना, त्या कुठे भेटल्या,  प्रेम कसं जुळलं आणि त्यांनी लग्न कसं केलं, याचे किस्से सांगितले.ओंग सांगतो, माझ्या पहिल्या बायकोचं नाव आहे, नोंग स्प्राइट. मित्राच्या लग्नाला गेलो असताना ती मला दिसली, आमची नजरानजर झाली, एकमेकांवर प्रेम बसलं आणि आम्ही लग्न केलं! दुसऱ्या बायकोचं नाव आहे नोंग एल. बाजारात भाजीपाला घ्यायला गेलो असताना आमची ओळख झाली आणि आम्ही लग्न केलं. माझी तिसरी बायको मला भेटली एका हॉस्पिटलमध्ये. तिथेच आमच्या हृदयाचे ठोके वाजले आणि लग्न होऊन ती माझ्या घरी आली. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बायकोची भेट मात्र सोशल मीडियावर झाली. तिथेच आमचे ‘चक्कर’ सुरू झाले. नंतर या चकरा घरापर्यंत येऊन थांबल्या आणि आमचे लग्न झाले. माझी सातवी बायको मला भेटली ती मात्र मंदिरात. दर्शनासाठी गेलो असताना, तिच्याच दर्शनानं मी भारावून गेलो. तिचीही माझ्यासारखीच परिस्थिती झाली आणि घरात आणखी एक तरुण नवी बायको आली.  ओंगच्या आठव्या बायकोचा किस्सा तर आणखी मजेदार आहे. तो किस्साही ओंग अगदी रंगवून सांगतो. मी माझ्या चार बायकांना घेऊन पट्टायाच्या ट्रीपला गेलो होतो. सुट्यांची मजा लुटत होतो. तिथेच आमची नोंगबरोबर भेट झाली. या प्रवासात तीही आमच्याबरोबर सामील झाली आणि कायमची ‘हमसफर’ बनण्याचा निर्णय तिनं घेतला. माझ्या बाकीच्या बायकांना काहीच आक्षेप नसल्यानं नोंग आठवी बायको बनून माझ्या घरात आली! ओंगला पहिल्या बायकोपासून एक मुलगा आहे. येत्या काही दिवसांत त्याच्या घरात एकाच वेळी आणखी काही पाळणे हलणार आहेत. सगळ्या बायकांचं म्हणणं आहे, एकाच घरात एकाच नवऱ्याबरोबर एकत्र राहण्यात आम्हाला काहीही अडचण नाही. आमचं कोणाचंच आजपर्यंत कशाहीवरून कधीही भांडण झालेलं नाही! ओंगची पहिली बायको म्हणते, दुसरं लग्न करण्यासाठी मीच ओंगला मान्यता दिली होती. इतर सातही बायकांचं म्हणणं आहे, ओंगचं लग्न झालेलं आहे, हे आम्हाला आधीच माहीत होतं, पण तो इतका ‘प्रेमळ’ आहे, की आमचं आपोआपच त्याच्यावर प्रेम बसलं आणि आम्ही त्याच्याशी लग्न केलं!ओंगची पहिली बायको वगळता इतर साऱ्या बायका सांगतात, ज्याचं आधीच लग्न झालेलं आहे आणि ज्याला काही बायका आहेत, अशा ओंगबरोबर आम्ही लग्न करतोय, असं घरी सांगितल्यावर आधी ते खूपच नाराज झाले, पण आमचं प्रेम पाहून नंतर ते राजी झाले.  

तुही कर की दुसरं लग्न!ओंग म्हणतो, मी माझ्या आठही बायकांना आधीच सांगितलं आहे, भविष्यात तुमचंही कधी कोणावर प्रेम बसलं, तर तुम्ही दुसरं लग्न करू शकता. मी फक्त तीन वेळा तुम्हाला विचारेन, खरंच, तुला मला सोडून जायचं आहे? तुमचं उत्तर ‘हो’ आलं तर मी आनंदानं तुम्हाला परवानगी देईन. अनेकांना वाटतं, आठ-आठ बायकांना मी सांभाळतो, म्हणजे मी अमीर बाप का बेटा असेल; पण तसं नाही, आम्ही सारेच जण काम करतो आणि आमच्या गरजेपुरतं कमावतो!

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFamilyपरिवार