लंडन - एका निळ्या हिऱ्याचे लिलाव तब्बल ३५९ कोटी रुपयांना होण्याचा अंदाज आहे. ब्ल्यू डायमंडचं हे सर्वात मोठं लिलाव असल्याचं बोललं जात आहे. हा ब्लू डायमंड ज्याला डी बीयर्स कलिनन ब्लू च्या नावाने ओळखलं जातं, तो १५.१० कॅरेटचा आहे.
रिपोर्टनुसार या अत्यंत दुर्मीळ ब्ल्यू डायमंडला एप्रिल महिन्यात हाँगकाँग लक्झरी वीक सेल्समध्ये फाईन आर्ट्स कंपनी Sotheby's कडून लिलावासाठी सादर केलं जाणार आहे. त्याची किंमत ४८ मिलियन डॉलर (३५९ कोटी रुपये) एवढी निश्चित करण्यात आली आहे.
Sotheby's च्या आशियाई हेडनी सांगितले की, बाजारामध्ये कुठल्याही प्रकारचे निळे हिरे हे दुर्मीळ आहेत. मातर हा हिरा दुर्मिळातील दुर्मीळ आहे. हा डायमंड पहिल्यांदा एप्रिल २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कलिनन खाणीमध्ये शोधला गेला होता. ही खाण दुर्मीळ निळ्या रत्नांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या Sotheby's एप्रिलमध्ये हाँगकाँग लक्झरी वीक सेलच्या दरम्यान डी बीयर्स कलिनन ब्ल्यू डायमंडचा लिलाव करण्यासाठी तयार आहे.
१५.१० कॅरेटचा स्टेप-कट हा हिरा लिलावामध्ये प्रदर्शित होणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि चमकदार निळा हिरा आहे. जेमोलॉजिकल इन्स्टिट्युट ऑफ अमेरिका ने याला आतापर्यंतचा सर्वात मोठा अंतरिक रूपाने दोषरहीत स्टेप-कट ज्वलंत निळा हिरा आहे.Sotheby's च्या म्हणण्यानुसार लिलावामध्ये आतापर्यंत १० कॅरेटपेक्षा अधिकचे केवळ पाच हिरेच आहेत. त्यातील कुठलाही १५ कॅरेटपेक्षा अधिक नाही आहे.