जेव्हा आपण कुटुंब किंवा जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जातो तेव्हा थांबण्यासाठी सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये खोली बुक केली जाते. ती निवडताना ती जागा चांगली असेल याची काळजी घेतली जाते. मात्र अनेकदा बुकिंगनंतर काही परिस्थितीमुळे बुकिंग रद्द करावे लागते. अशीच घटना एका चिनी जोडप्यासोबत घडली. त्यांनी दक्षिण कोरियामधील एका हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं. मात्र काही कारणास्तव त्यांना बुकिंग रद्द करायचं होतं. मात्र हॉटेलने बुकिंग रद्द करण्यास नकार दिला. त्यानंतर या जोडप्यानं जे काही केलं त्याची आता जगभरात चर्चा सुरू आहे.
साऊथ चायना बोर्डिंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार ही घटना एका जोडप्याशी संबंधित आहे. हे जोडपं दक्षिण कोरियातील एका हॉटेलमध्ये बुकिंग रद्द न झाल्याने नाईलाजास्तव थांबलं होतं. हॉटेलने आपल्या नियमांमधून बुकिंग रद्द करण्याची तरतूद हटवली होती. मात्र हॉटेलने बुकिंग रद्द करण्याची विनंती नाकारल्यानंतर या जोडप्याने बदला घेण्यासाठी असा काही डाव खेळला की, त्यामुळे हॉटेलचा डाव हॉटेलवरच उलटला. या जोडप्यानं हॉटेलमधील गॅस २५ दिवस सुरू ठेवला. तसेच त्यांनी विजेचाही वारेमाप वापर केला. या जोडप्याने कथितपणे १२० टन पाण्याचा अपव्यय केला. या पाण्याची किंमत ११६ अमेरिकन डॉलर होती. तर विजेचं बिल आणि तब्बल ७३० अमेरिकन डॉलर एवढं गॅसचं बिल झालं.
याचं झालं असं की, या जोडप्याने दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सियोलमध्ये २५ दिवसांसाठी एक व्हिला बुक केला होता. तसेच किंमत न पाहता, तसेच ते ठिकाण कुठे आहे, हे न तपासता सर्व बिल आधीच भरून टाकले होते. मात्र नंतर हा व्हिला बाहेरील भागात असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यानंतर हा व्हिला शहराबाहेर असल्याचं त्यांना जाणवलं. तेव्हा त्यांनी हे ठिकाण गैरसोईचं असल्याचं सांगत बुकिंग रद्द करण्यास सांगितलं. मात्र हे बुकिंग हॉटेलने नियमांवर बोट ठेवत रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे या जोडप्याला या हॉटेलमध्येच राहावं लागलं. त्यांनी बुकिंगची रक्कमही आधीच भरली होती.
नाईलाजास्तव हॉटेलमध्ये राहावं लागत असल्याने या जोडप्याने हॉटेलमधील सोई-सुविधांचा वारेमाप वापर करण्यास सुरुवात केली. मात्र याचं वेगळं बिल येऊ शकतं याची त्यांना कल्पना नव्हती. पाणी, वीज आणि गॅस यांच्यासह इतर गोष्टींचं बिलही अधिक आलं. शेवटी त्यांना सगळ्या बिलांचा भरणा करावा लागला. याची माहिती जेव्हा सोशल मीडियावर समोर आली. तेव्हा लोक या जोडप्यावर चांगलेच भडकले. काही जणांनी हे महापाप आहे. अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करता कामा नये होता, अशा प्रतिक्रिया दिल्या.