नवी दिल्ली - जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे. हा व्हिडीओ मेट्रो रेल्वेमधील आहे. ज्यामध्ये दोन महिला सिटसाठी भांडताना दिसत आहेत. मेट्रोमध्ये अशा घटना दररोज घडत असतात. तसेच सिटवरून हमरी तुमरी होत असते. या व्हिडीओमध्ये भांडणाऱ्या महिलांबरोबरच बाजूला बसलेली एक मुलगी दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सर्वांच्या नजरा एका तरुणीवर खिळल्या आहेत. जी या महिलांमधील भांडण एन्जॉय करत मस्त मजेत बर्गर खात आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये साडी नेसलेली एक महिला मेट्रोच्या सिटवर बॅग ठेवून बसली आहे. तिच्या बाजूला बसलेल्या तरुणीनेही सीटवर बॅग ठेवली आहे. त्यामुळे एका प्रवाशाच्या बसण्याची जागा अडली होती. अशा स्थितीत जेव्हा एका तरुणीने येऊन जागा देण्यास सांगितले तेव्हा त्यांनी तिला जागा देण्यास नकार दिला. आमच्या सिट नाही, तुम्हाला जिथे जागा दिसते तिथे बसा, असं त्यांच्यापैकी एकीने सांगितलं. त्यानंतर ती तरुणी थोड्याशा रिकाम्या दिसणाऱ्या जागेत त्यांच्या बाजूलाच बसते. त्यानंतर त्या दोघींमध्ये पुन्हा एकदा बोलाचाल सुरू होते. साडी नेसलेली तरुणी तिला सांगते की माझ्यावर बसू नका. त्यावर दुसरी तरुणी सांगते की तुम्ही सिट आरक्षित करू शकत नाही. त्यावरून त्या दोघींमधील बोलचाल खूप वाढते. मात्र या दरम्यान, शेजारी बसलेली तरुणी अगदी आरामात बर्गर खात राहते.
हा व्हिडीओ @Wellutwt या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच त्यावर जागा नाही आहे. खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन अशी हटके कॅप्शन देण्यात आली आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून, त्याला हजारो लाईक्स मिळत आहेत.