नोकरी मिळवण्यासाठी अनेकदा बऱ्याच खटपटी कराव्या लागतात. अनेक कार्यालयांमध्ये बायोडेटा देऊन, नोकरी देणाऱ्या साईट्सवर माहिती देऊन, ओळखीतल्या अनेकांना सांगूनही कधीकधी नोकरी मिळत नाही. असाच काहीसा प्रकार ३४ वर्षांच्या इनिन व्हिक्टर गॅरिकसोबत घडला. मात्र व्हिक्टरनं एक शक्कल लढवली. त्यानंतर त्याला अनेक कंपन्यांमधून नोकरीसाठी विचारणा झाल्या.
मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, ३४ वर्षांच्या इनिन व्हिक्टर गॅरिकला बरेच प्रयत्न करूनही नोकरी मिळत नव्हती. त्यानंतर त्यानं नावात बदल करण्याचा निर्णय घेतला. आपण नायजेरियन नावात बदल केला. त्यानंतर नोकरीसाठी अनेक कंपन्यांमधून कॉल येण्यास सुरुवात झाल्याचं गॅरिकनं सांगितलं.
इनिन व्हिक्टर गॅरिक नाव बदलून त्यानं स्वत:चं नाव व्हिक्टर गॅरिक ठेवलं. त्यानंतर गॅरिकचं नशीब पालटलं. गॅरिकच्या नावातील पहिला शब्द उच्चारताना अनेक रिक्रूटर्सला अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी गॅरिक मुलाखतीच्या पहिल्याच फेरीत बाद व्हायचा. त्यानंतर गॅरिकनं त्याच्या नावात थोडा बदल केला.