जोफ्रा आर्चरची रशिया-युक्रेनच्या युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी ठरली खरी, ते जुनं ट्वीट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:43 PM2022-02-25T14:43:49+5:302022-02-25T14:47:46+5:30

रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Russia - Ukraine War) जोफ्रानं २०१४ साली केलेलं ट्विट पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे.

Joffra Archer's prediction came true about Russia and Ukraine war | जोफ्रा आर्चरची रशिया-युक्रेनच्या युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी ठरली खरी, ते जुनं ट्वीट व्हायरल

जोफ्रा आर्चरची रशिया-युक्रेनच्या युद्धाबद्दल केलेली भविष्यवाणी ठरली खरी, ते जुनं ट्वीट व्हायरल

googlenewsNext

इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा त्याच्या अचूक भविष्यासाठीही प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधील अनेक घटनांवर त्याने केलेलं भाकित खरं ठरलं आहे. आर्चरचे अनेक ट्विट्स प्रसिद्ध आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Russia - Ukraine War) जोफ्रानं २०१४ साली केलेलं ट्विट पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे.

जोफ्रानं २०१४ साली 'कम ऑन रशिया' असं ट्विट केलं होतं. त्याचं हे ट्विट रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर व्हायरल झालं आहे. त्यानं ८ वर्षापूर्वीच या युद्धाचे भाकित केले होते, असे मत आता  नेटिझन्स व्यक्त करत आहेत. २०१४ साली झालेल्या रशिया विरूद्ध बेल्जियम यांच्यातील फुटबॉल मॅचनंतर जोफ्रानं हे ट्विट केले होते.  पण त्याला ताज्या घडामोडींमुळे नवा संदर्भ प्राप्त झाला आहे. जोफ्रा नेहमीच काळाच्या पुढे असतो असं मत नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

जोफ्रा आर्चरनं ट्विट द्वारे भविष्य सांगण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याला यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सनं ८ कोटींना खरेदी केले होते. त्यानंतरही आर्चरचे ८ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल झाले होते. त्यावेळी त्याने मुंबईकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. जोफ्रा गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. तसंच तो यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) खेळणार देखील नाही. त्यानंतरही मुंबईनं त्याच्यावर इतका पैसा खर्च केल्याबद्दल फॅन्समध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते.

मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी आर्चरसाठी इतका पैसा का खर्च केला याचे कारण सांगितले आहे. 'आर्चर आज जखमी आहे. पण तो फिट झाल्यानंतर जसप्रीत बुमरहाचा भक्कम जोडीदार असेल. आम्ही अनेक गोष्टींचा विचार केला. पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं फास्ट बॉलर्सची खरेदी झाली ते पाहता आमच्यासाठी जोफ्रा हा पर्याय होता. त्यामुळे आम्ही त्याच्या नावावर यापूर्वीच चर्चा केली होती,' असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Joffra Archer's prediction came true about Russia and Ukraine war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.