जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते, त्याचं मरण निश्चित मानलं जातं. शिक्षा ठरल्यावरच कैद्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. या व्यक्तीच्या डोक्यात तो मरणार हे माहीत असल्याने सतत काहीना काही विचार सुरू राहतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याला तीनवेळा फाशी देण्यात आली, पण तरी त्याचा जीव गेला नाही.
आम्ही तुम्हाला सांगतोय जॉन ली या व्यक्तीबाबत. जॉन ली एका महिलेच्या घरी नोकरी करत होता. ती महिला फार श्रीमंत होती. एका दिवस महिलेच्या घरी चोरी होते आणि चोरीच्या आरोपात महिला जॉन ली ला कामाहून काढते. त्यानंतर १८८४ मध्ये त्याला इंग्लंडच्या एका गावातून एका महिलेच्या हत्येच्या आरोपात अटक झाली होती. मात्र, तो निर्दोष असल्याचं त्यानं सांगितलं होतं. पण काही पुरावे असे सापडले होते की, ज्यातून तोच दोषी असल्याचं सिद्ध होत होतं.
दुसरीकडे जॉन पुन्हा पुन्हा तो निर्दोष असल्याचं सांगत होता. पण अर्थातच घटनास्थळी त्याच्याशिवाय दुसरं कुणी नव्हतं. तसेच त्याच्या हातावरील निशाणही याकडे इशारा करत होते की, याने काहीतरी केलंय. मग ब्रिटीश पोलिसांनी जास्त डोकं न खर्ची, जास्त वेळ न घालवता जॉनला गुन्हेगार मानत कोर्टात केस सुरू केली. कोर्टानेही त्याला दोषी ठरवलं आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.
२३ फेब्रुवारी १८८५ ला जॉनला तोंड झाकून फासावर लटकवण्यासाठी नेण्यात आलं. जल्लादाने त्याला फाशी देण्यासाठी ह्रॅंडल खेचलं. पण हैराण करणारी बाब म्हणजे जॉनच्या खाली असलेला लाकडाचा दरवाजा उघडलाच नाही. जल्लादाने अनेकगा हॅंडल खेचून पाहिलं, पण काही फायदा झाला नाही. जॉन फाशीपासून वाचला.
दुसऱ्या दिवशी जॉनला पुन्हा फाशी देण्यासाठी नेण्यात आलं. तर त्या दिवशीही दरवाजा उघडला नाही आणि लागोपाठ तीनदा असं झाल्यावर हे प्रकरण कोर्टात गेलं. जिथे याची चौकशी करण्यात आली की, हे का होतंय? का एक व्यक्ती फाशीच्या शिक्षेतून तीन-तीनदा वाचला. आजपर्यंतच्या इतिहासात असं की झालं नव्हतं. केस हाय अथॉरिटीपर्यंत गेली. पूर्ण चौकशी केल्यावर समोर आलं की, एका लोखंडाच्या तुकड्यामुळे दरवाजा पूर्णपणे जाम झाला होता. त्यामुळे तो उघडत नव्हता. यानंतर लोकांना हेच वाटलं की, जॉनचा देवावर विश्वास होता आणि देवानेच त्याची मदत केली होती.
या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने जॉनची शिक्षा माफ केली होती. कोर्टाने सांगितलं होतं की, जॉनला तीनवेळा मृत्यूच्या शिक्षेची जाणीव झाली आहे. इतकी शिक्षा त्याच्यासाठी पुरेशी आहे. १९ फेब्रुवारी १९४५ लाक जॉनचं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं होतं. पण त्याचं नाव आजही इतिहासाच्या पानावर आहे.