नवी दिल्ली - आपला देश जुगाड करण्याच्या बाबतीत संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जेव्हा एखादे काम अडते, तेव्हा लोक ते काम पूर्ण करण्यासाठी काही ना काही जुगाड नक्कीच करताना दिसतात. हल्ली तर सोशल मिडियावरही असे जुगाड केलेले व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत असतात. अनेक वेळा तर, असेही व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपणही अवाक होत असाल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने देशी जुगाड वापरून दुचाकीने चालणारी अॅम्ब्युलन्स तयार केली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Jugaad Man made ambulance with bike internet users loves it IPS share video)
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (Rupin Sharma, IPS) यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे, ‘भारतीय शोध.' या व्हिडिओत आपण पाहू शकता, की एका व्यक्तीने दुचाकीला जोडलेली एक अॅम्ब्युलन्स तयार केली आहे. यात तो एका महिलेला झोपवून घेऊन जात आहे. हा व्हिडिओ ओडिशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकही या तरुणाने केलेल्या या जुगाडाचे कोतुक करत आहेत.
२५ लाख रूपये खर्चून स्कूल बसला बनवलं लक्झरी घर, घर असं की बघतंच रहावं!
Video : आधी ४ जण जबरदस्ती बाईकवर बसले; पाचव्याला अडजस्ट करण्यासाठी केला भन्नाट जुगाड
हा व्हिडिओ आतापर्यंत 25 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लोक गमतीशीर प्रतिक्रियाही देत आहेत आणि याच बरोबर, ही अॅम्ब्युलन्स तयार करणाऱ्या व्यक्तीची तारीफही करत आहेत. एका यूझरने लिहिले आहे, ‘हा आहे माझा अद्भुत देश'. एकाने लिहिले आहे, ‘खूपच छान'. आणखी एका युझरने तर लिहिले आहे, "जगात काय मिळत नाही... आणि सापडूनही भारतीय डोक सापडत नाही... खुपच छान जुगाड..."