लग्न आणि लग्नासंबंधी अनेक अजब घटना समोर येत असतात. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये एका कपलचं लग्न ठरलं होतं. दोन्ही परिवार श्रीमंत. अशात लग्नही कोट्यावधी रूपये खर्च करून शाही पद्धतीने झालं. वरात विमानाने गोव्याला नेली गेली. एका मोठ्या रिसॉर्टमध्ये नवर-नवरदेवाने सात फेरे घेतले. हे सगळं व्यवस्थित झालं. पण लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने नवरदेवाला असं काही सांगितलं की, त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. ज्यानंतर दोघांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.
लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाने नवरीला सांगितलं की, तिचं एका दुसऱ्या तरूणावर प्रेम आहे आणि तिने हे लग्न कुटुंबियांच्या दबावामुळे केलं. यानंतर कपलमध्ये वाद झाला. वाद पोलीस आणि नंतर कोर्टात पोहोचला. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. नवरदेवाने नवरीवर फसवणुकीचा आरोप केला तर नवरीने नवरदेवावर मारहाण आणि हुंड्याचा आरोप केला.
हे प्रकरण 26 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झालं होतं. कानपूरच्या आयुष खेमकाचं लग्न एका व्यापाऱ्याच्या मुलीसोबत झालं होतं. दोन्ही कुटुंब श्रीमंत आणि एकाच जातीचे आहेत. लग्न शाही पद्धतीने करण्यात आलं. पाहुण्यांना लग्नासाठी विमानाने गोव्याला नेण्यात आलं. आलिशान हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती.
पण आयुषचं म्हणणं आहे की, लग्नानंतर नवरीने त्याला सांगितलं की, तिने हे लग्न तिने दबावात केलं आणि तिचं दुसऱ्या तरूणावर प्रेम आहे. याच्या काही दिवसांनी नवरीच्या प्रियकराचं तिच्या सासरी येणं-जाणं सुरू झालं. आयुषने पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज दाखवलं. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढला.
आयुष म्हणाला की, बदनामी होईल किंवा माझी इज्जत निघेल म्हणून मी पत्नीची बाब कुणालाच सांगितली नाही. तिने सुहागरातच्या दिवशीच हे सांगितलं होतं ती मला तिच्या शरीराला हात लावू देणार नाही आणि माझी पत्नी बनून राहणार नाही. पण जेव्हा मी विरोध केला तेव्हा तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. नंतर मामा आणि नातेवाईकांना बोलवून मला मारहाण केली गेली. सोबतच घरातील दागिनेही घेऊन गेले.
याबाबत आयुषने पोलिसात तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. कारण आयुषच्या पत्नीचा मामा शहरातील मोठा व्यापारी आहे. उलट सीसीटीव्ही इत्यादी पुरावे गायब केले आणि चुकीचा जबाब देऊन फायनल रिपोर्ट लावला. ज्यावर आयुषने कोर्टात अपील केली. कोर्टाच्या आदेशावरून ही केस एसीपी अनवरगंजकडे सोपवण्यात आली आहे.
तेच आयुषच्या पत्नीकडील लोक यावर काहीच बोलायला तयार नाहीत. पण त्यांनी त्यांच्या तक्रारीत आयुषवर आणि त्याच्या परिवारावर हुंड्यासाठी छळ, मारहाण, शोषण, धमकी देण्यासारखे गंभीर आरोप केले. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कानपूरमधील हे हाय-प्रोफाइल लग्न कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात अडकलं आहे.