कानपूर: गुन्हेगारीला आळा घालण्यात असमर्थ ठरणारे कानपूर पोलीस सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. कोरोना संकट काळात पोलीस अजब-गजब कारनामे करत आहेत. त्यांच्या या कारनाम्यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कानपूरच्या बेकनगंज पोलिसांनी केलेली एक कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी चक्क एका बकऱ्यावर कारवाई केली आहे. वीकेंड लॉकडाऊन दरम्यान मास्कशिवाय फिरणाऱ्या एका बकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला जीपमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यानंतर बकऱ्याच्या मालकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुझ्या बकऱ्याला घरातच ठेव. त्याला बाहेर सोडू नको, असा सल्ला पोलिसांनी बकऱ्याच्या मालकाला दिला. त्यानंतर बकऱ्याची सुटका झाली. पोलिसांनी केलेल्या हास्यास्पद कारवाईचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे.
VIDEO: काय सांगता?; मास्क न घातल्यानं पोलिसांकडून बकऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 2:07 PM