लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्यात आलेला नसून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. पण धार्मिक कार्यक्रम लग्नसोहळ्यांना परवागनी देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत अनेकांनी आपलं लग्न पुढे ढकलंल आहे. तर काहींनी जुगाड करत, टेक्नॉलॉजीचा वापर करत आपलं लग्न केलं आहे. अशीच एक घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
उत्तर प्रदेशमध्ये एक अनोखा प्रकार घडला. कानपूरमध्ये हा विवाहसोहळा पाहायला मिळाला. लॉकडाऊनमध्ये लग्न करण्यास मुलाने नकार दिल्यानंतर नवरीमुलगी स्वत: वरात घेऊन निघाली. संपर्ण परिसर सॅनिटाईज केल्यानंतर मास्क लावून अखेर त्यांचा विवाह झाला. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या लग्नाची चर्चा जवळपासच्या गावात होत आहे.
मोहनपूर गावात पंचायत प्रमुख वीरेंद्र कुमार यांचे लग्न अनोख्या पद्धतीनं झालं. तुम्ही पाहिलं असेल नवरा मुलगा मुलीकडे जातो. पण लॉकडाऊनमध्ये मुलाने लग्न करण्यास नकार दिला तर मुलगी स्वतःच नवरदेवाच्या घरापर्यंत पोहोचली सोशल मीडियावर या मुलीच्या डेअरिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या दोघांनी विवाह केला आहे.
कोरोना संकट बनलं आनंदाची आठवण; 'त्या' जुळ्या मुलांची नावं ठेवली क्वारंटाईन अन्...
एका एअरपोर्टखाली सापडले हजारो वर्ष जुने हत्तींच्या पूर्वजांचे अवशेष, फोटो व्हायरल....