पती-पत्नीतील प्रेमाचं नातंच काही वेगळं असतं. आयुष्यभरासाठी एकमेकांसह राहण्याची आणि नेहमी साथ देण्याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण काळापुढे कोणाचेही चालत नाही. पती पत्नीच्या प्रेमाची एक अनोखी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही घटना वाचल्यानंतर तुम्हाला शाहाजनहानची आठवण नक्की होईल. कर्नाटकातील उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब जणूकाही पोरकं झालं. माधवी गुप्ता असं श्रीनिवास यांच्या पत्नीचे नाव होते.
कर्नाटकातील उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांनी आपल्या देवाघरी गेलेल्या पत्नीचा (सिलिकॉन) मेणाचा पुतळा तयार केला आहे. या मेणाच्या पुतळ्यासोबतच त्यांनी आपल्या नवीन घरात प्रवेश केला आहे. २०१७ मध्ये एका कार अपघातात श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नीने आपले प्राण गमावले. आता नवीन घरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी मुर्तीकाराकडून आपल्या पत्नीसारखा हुबेहूब मेणाचा पुतळा तयार करून घेतला. माधवी गुप्ता यांच्या या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एएनआयशी बोलताना श्रीनिवास गुप्ता यांनी सांगितले की, ''माझ्या घरात पत्नीला पुन्हा पाहून मला खूप आनंद होत आहे. बेंगलुरूचे मुर्तीकार श्रीधर मुर्ती यांना माझ्या पत्नीचा पुतळा तयार करण्यासाठी १ वर्षाचा वेळ लागला. हा पुतळा दीर्घकाळ चांगला राहावा यासाठी यांनी सिलिकॉनचा वापर केला आला आहे.'' हा फोटो ११ ऑगस्ट म्हणजेच आज सकाळी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा फोटो शेअर केल्यानंतर कमी वेळातच व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर या फोटोला ७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि १ हजारांपेक्षा जास्त ट्विट्स मिळाले आहेत. गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ या ठिकाणी पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण कुटुंब माधवी यांच्यासह आहे. हा पुतळा हूबेहूब माधवी यांच्याप्रमाणे दिसत आहे.
हे पण वाचा :
कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं
घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!
शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो
याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल