Curd Compney : आजकाल जास्तीत जास्त लोक मोबाइल फोनवर आपला जास्त वेळ घालवतात. लोक आपल्या दैंनंदिन जीवनाला विसरून फोनच्या आहारी गेले आहेत. तुम्हीही असेच असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आइसलॅंडिक योगर्ट ब्रांड Siggi's तुम्हाला 10,000 डॉलर देणार आहे. जसा की, एक ट्रेंड सुरू होता "Dry January", त्याचप्रमाणे हा "Digital Detox Program" ही ट्रेंड करत आहे.
लोक याला डिजिटल डिटॉक्सही म्हणत आहेत. निवडण्यात आलेल्या दहा लोकांना एक खास बॉक्स दिला जाणार ज्यात फोन बंद करून ठेवावा लागेल. मग काय जीवनाचा आनंद घ्या तोही फोनशिवाय.
एक महिन्यासाठी मोबाइल सोडा, कमवा 8 लाख रूपये
एक महिना फोन सोडण्याचं तुम्हाला हे कमाल बक्षीस मिळणार आहे. 10,00 डॉलरसोबत मिळणार एक जुन्या काळातील फ्लिप फोन, ज्यात इमरजन्सीसाठी एक सिम कार्डही असेल. सोबतच तीन महिन्यांसाठी फ्री Siggi's योगर्टचा डबाही मिळेल. कंपनी Siggi's चं म्हणणं आहे की, सामान्य माणूस रोज 4 ते 5 तास फोनवरच वेळ घालवतात. 'Dry January' द्वारे यावर्षी आम्ही काहीतरी नवीन करत आहोत. यावेळी दारू सोडण्याऐवजी आम्ही तुम्हाला चॅलेंज देत आहोत की, आपला फोन सोडा. आम्हाला विश्वास आहे की, आयुष्याला कमी डिस्ट्रक्शनसोबत जगण्याची मजा आहे. आजकाल मोबाइलमुळेच जगण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
काय आहे 'डिजिटल डिटॉक्स प्रोग्राम'?
31 जानेवारीपर्यंत Siggi's च्या वेबसाइटवर जाऊन 'डिजिटल डिटॉक्स प्रोग्राम' साठी नाव नोंदवू शकता. एक महिना विना फोन जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता आणि जर नशीब जोरावर असेल तर 10,000 डॉलरही जिंकू शकता. असे चॅलेंज फारच कमी बघायला मिळतात. तुम्हीही तुमचं नशीब चमकवू शकता.