लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतायेत युरोपमध्ये हवाई सफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:42 PM2022-07-27T15:42:00+5:302022-07-27T15:43:00+5:30

Keralite builds four-seater plane in the UK : अशोक यांनी स्वतः लॉकडाऊनमध्ये 4  सीटर विमान बनवले आणि कुटुंबासह युरोपमध्ये हवाई सफर केली.

Kerala Man Ashok Travels Europe With Family on Plane He Built During Covid Lockdown | लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतायेत युरोपमध्ये हवाई सफर!

लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतायेत युरोपमध्ये हवाई सफर!

Next

नवी दिल्ली : अनेकांना फिरायची आवड असते. ते दरवर्षी देश-विदेशात फिरतात. मात्र, जर तुम्ही कधी परदेशात गेला असाल तर फ्लाइटची तिकिटे किती महाग असतात, हे तुम्हाला माहीत असेलच. दरम्यान, या महागड्या फ्लाइट तिकिटांमुळे वैतागून केरळमधील एका व्यक्तीने स्वतःचे विमान तयार केले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी हे विमान बनवले आणि कुटुंबासह युरोपचा प्रवास सुद्धा केला.

आम्ही सांगत आहोत केरळचे माजी आमदार ए वी थामरक्षन यांचा मुलगा अशोक यांच्याबद्दल. अशोक यांनी स्वतः लॉकडाऊनमध्ये 4  सीटर विमान बनवले आणि कुटुंबासह युरोपमध्ये हवाई सफर केली. हे विमान बनवण्यासाठी जवळपास 80 लाख रुपये खर्च झाले आहेत, असे अशोक यांनी सांगितले. तसेच, अवघ्या दीड वर्षात हे विमान बनवले. संपूर्ण जग कोरोनामध्ये घरांमध्ये कोंडले असताना अशोक हे विमान तयार करत होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशोक यांनी इंजिनीअरिंग केले आहे. ते सध्या फोर्ड मोटर कंपनीत अभियंता आहेत. त्यांनी या गृहनिर्मित विमानाचे नाव मोठी मुलगी दियाच्या नावावरून 'जी-दिया' ठेवले आहे. स्वतःचे विमान असावे, असे अशोक सांगतात. जेणेकरुन जेव्हा त्यांना फिरायचे असेल तेव्हा ते सहज फिरू शकतील. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक यांनी कमी किमतीच्या विमानाचे मॉडेल तयार करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी ब्रिटनमध्येच एक छोटेसे चार आसनी विमान बनवण्यास सुरुवात केली.

विमानाचा वेग 200 किलोमीटर प्रतितास 
हे विमान बनवण्यासाठी लागणारे साहित्य आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून खरेदी केल्याचे अशोक यांनी सांगितले. हे साहित्य घेऊन त्यांनी घराच्या एका भागात वर्कशॉप सुरू केले. हा संपूर्ण प्रकल्प ब्रिटनच्या नागरी विमान वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आला. या विमानाचा कमाल वेग 200 किलोमीटर प्रतितास आहे आणि त्याच्या उड्डाणासाठी ताशी सुमारे 20 लिटर इंधन लागते. दरम्यान, अशोक हे 2016 मध्ये पत्नी आणि दोन मुलींसह लंडनला गेले आणि तिथेच स्थायिक झाले.

Web Title: Kerala Man Ashok Travels Europe With Family on Plane He Built During Covid Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.