शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतायेत युरोपमध्ये हवाई सफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 3:42 PM

Keralite builds four-seater plane in the UK : अशोक यांनी स्वतः लॉकडाऊनमध्ये 4  सीटर विमान बनवले आणि कुटुंबासह युरोपमध्ये हवाई सफर केली.

नवी दिल्ली : अनेकांना फिरायची आवड असते. ते दरवर्षी देश-विदेशात फिरतात. मात्र, जर तुम्ही कधी परदेशात गेला असाल तर फ्लाइटची तिकिटे किती महाग असतात, हे तुम्हाला माहीत असेलच. दरम्यान, या महागड्या फ्लाइट तिकिटांमुळे वैतागून केरळमधील एका व्यक्तीने स्वतःचे विमान तयार केले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी हे विमान बनवले आणि कुटुंबासह युरोपचा प्रवास सुद्धा केला.

आम्ही सांगत आहोत केरळचे माजी आमदार ए वी थामरक्षन यांचा मुलगा अशोक यांच्याबद्दल. अशोक यांनी स्वतः लॉकडाऊनमध्ये 4  सीटर विमान बनवले आणि कुटुंबासह युरोपमध्ये हवाई सफर केली. हे विमान बनवण्यासाठी जवळपास 80 लाख रुपये खर्च झाले आहेत, असे अशोक यांनी सांगितले. तसेच, अवघ्या दीड वर्षात हे विमान बनवले. संपूर्ण जग कोरोनामध्ये घरांमध्ये कोंडले असताना अशोक हे विमान तयार करत होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशोक यांनी इंजिनीअरिंग केले आहे. ते सध्या फोर्ड मोटर कंपनीत अभियंता आहेत. त्यांनी या गृहनिर्मित विमानाचे नाव मोठी मुलगी दियाच्या नावावरून 'जी-दिया' ठेवले आहे. स्वतःचे विमान असावे, असे अशोक सांगतात. जेणेकरुन जेव्हा त्यांना फिरायचे असेल तेव्हा ते सहज फिरू शकतील. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक यांनी कमी किमतीच्या विमानाचे मॉडेल तयार करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी ब्रिटनमध्येच एक छोटेसे चार आसनी विमान बनवण्यास सुरुवात केली.

विमानाचा वेग 200 किलोमीटर प्रतितास हे विमान बनवण्यासाठी लागणारे साहित्य आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून खरेदी केल्याचे अशोक यांनी सांगितले. हे साहित्य घेऊन त्यांनी घराच्या एका भागात वर्कशॉप सुरू केले. हा संपूर्ण प्रकल्प ब्रिटनच्या नागरी विमान वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात आला. या विमानाचा कमाल वेग 200 किलोमीटर प्रतितास आहे आणि त्याच्या उड्डाणासाठी ताशी सुमारे 20 लिटर इंधन लागते. दरम्यान, अशोक हे 2016 मध्ये पत्नी आणि दोन मुलींसह लंडनला गेले आणि तिथेच स्थायिक झाले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKeralaकेरळairplaneविमान