शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
3
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
4
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
5
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
6
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स
7
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
8
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
9
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
10
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
11
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
12
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
13
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
14
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
15
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
16
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
18
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
19
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
20
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान

नशीब फळफळले! मोहम्मद बावा तासाभरात बनले करोडपती, जिंकली लॉटरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 9:22 PM

Kerala man wins ₹1 crore lottery : घराच्या विक्रीचे टोकन अॅडव्हान्स मिळण्यापूर्वीच नशिबाने मोहम्मद बावा यांचे दार ठोठावले. त्यांना जॅकपॉट लागला आणि त्यांनी एक कोटीचे लॉटरीचे बक्षीस जिंकले.

कर्जबाजारी मोहम्मद बावा यांनी घर विकण्याची तयारी केली होती. घर विकण्यासाठी ग्राहकाकडून फक्त टोकन मिळणे बाकी होते. पण नशीब किंवा चमत्कारच म्हणा की त्यांना अचानक एक कोटींचा जॅकपॉट (Jackpot) लागला आणि एका मिनिटात तो करोडपती झाला. ही कहाणी नाही तर वास्तव आहे.  केरळमधील मोहम्मद बावा हे कर्जात बुडाले होते आणि कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नुकतेच बांधलेले घर विकण्याचा निर्णय घेतला. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घराच्या विक्रीचे टोकन अॅडव्हान्स मिळण्यापूर्वीच नशिबाने त्यांचे दार ठोठावले. त्यांना जॅकपॉट लागला आणि त्यांनी एक कोटीचे लॉटरीचे बक्षीस जिंकले.

केरळमधील कासारगोड ( Kasaragod)जिल्ह्यातील मंजेश्वर गावातील मोहम्मद बावा यांना सुमारे 50 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी नातेवाईक आणि बँकेकडून पैशांची गरज होती. दोन मुलींचे लग्न आणि व्यवसायातील तोटा यामुळे तो कर्जात बुडाले होते. त्यांनी कर्ज म्हणून मोठी रक्कम घेतली होती. कर्ज फेडण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे त्यांनी आपले नवीन घर विकण्याचा निर्णय घेतला होता.

मोहम्मद बावा यांनी सांगितले की, मी काळजीत होतो आणि देवाचे स्मरण करत होतो. कदाचित त्याने माझे ऐकले असेल. केरळ सरकारच्या फिफ्टी-फिफ्टी लॉटरीचा निकाल रविवारी दुपारी 3.30 वाजता मला कळला. मी सुदैवाने एक कोटी रुपये जिंकले होते. आदल्या दिवशीच, माझ्या घराच्या खरेदीदाराने आम्हाला सांगितले की, तो टोकन आगाऊ देण्यासाठी संध्याकाळी 5.30 वाजता आमच्या घरी येणार आहे. पण जेव्हा तो माझ्या घरी पोहोचला तेव्हा माझ्या घरात गर्दी होती आणि लॉटरी जिंकल्याबद्दल माझे अभिनंदन करण्यासाठी लोक आले होते. पण माझ्या भाग्यवान विजयाने घर खरेदीदार सुद्धा खूप खुश झाला होता.

"मी लॉटरी जिंकली आहे, त्यामुळे आता माझे घर विकण्याची गरज नाही, या पैशाने आमचे सर्व प्रश्न सुटतील," असे मोहम्मद बावा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, "मी नियमितपणे लॉटरीची तिकिटे काढत नाही. मी त्या लॉटरी एजंटला वैयक्तिकरित्या ओळखतो, म्हणून जेव्हा तो माझ्या घराजवळून जात असे तेव्हा तो मला काही तिकिटे देत असे", असही मोहम्मद बावा यांनी सांगितले. 

याचबरोबर, "मला लॉटरी लागेल, या अर्थाने मी हे तिकीट खरेदी केले नाही. पण नशीब असे की एक कोटी रुपये जिंकले. माझे संपूर्ण कर्ज फेडल्यानंतर मी उरलेली रक्कम गरीब आणि गरजूंमध्ये वाटून देईन", असेही मोहम्मद बावा म्हणाले. दरम्यान,मिळालेल्या माहितीनुसार, एक कोटी रुपयांमधून टॅक्स कपात केल्यावर मोहम्मद बावा यांना 63 लाख रुपये मिळतील.

टॅग्स :KeralaकेरळMONEYपैसा