एर्नाकुलम – केरळमध्ये एक अजब-गजब प्रकार समोर आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. केरळच्या एर्नाकुलममध्ये एक फोटोग्राफर हॉस्पिटलच्या बाहेर पोलिसांच्या कागदी कारवाईसाठी एका मृत व्यक्तीचा फोटो घेत होता, त्यावेळी अचानक त्याला आवाज ऐकू आला. फोटोग्राफरला शंका आली त्यानंतर तो मृतदेहाच्या आणखी जवळ गेला तर तो त्या मृतदेहातून आवाज येत असल्याने तो हैराण झाला.
फोटोग्राफरने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर ज्या व्यक्तीला मृत समजून कार्यवाही सुरु होती, तो जिवंत निघाला, सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. फोटोग्राफर टोमी थॉमस यांना एर्नाकुलम जिल्ह्यातील कालामस्सेरी परिसरात पोलिसांनी एका मृत व्यक्तिचे फोटो काढण्यासाठी बोलावले, ज्याला मृत समजत होते त्याचे नाव सिवादासन आहे. पोलिसांना वाटलं की, सिवादासन आता जिवंत नाही. टोमी जेव्हा सिवादासन यांच्या शरीराचे फोटो घेत होता, तेव्हा अचानक त्याच्या आवाज येऊ लागला, मृतदेहातून आवाज येत असल्याने पहिल्यांदा उपस्थितांमध्ये भीती पसरली, पोलिसांनी तात्काळ त्याला सिवादासनला त्रिशूरच्या जुबली रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सध्या सिवादासनवर रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, जर फोटोग्राफर टोमीने योग्य वेळी सिवादासनचा आवाज ऐकला नसता आणि रुग्णालयात दाखल केले नसते तर त्याचा मृत्यू झाला असता. सिवादासन हा पलक्कड येथील कालामस्सेरी येथे भाड्याच्या घरात एकटाच राहतो. रविवारी कोणीतरी सिवादासनला घरी भेटण्यासाठी आला. त्याला वाटले की, सिवादासन मृत पावलेला आहे, त्याने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला.
४८ वर्षीय फोटोग्राफर टोमी थॉमसने सांगितले की, मागील २५ वर्षापासून तो पोलिसांसाठी फोटोग्राफीचं काम करत आहे. मी जेव्हा सिवादासन यांच्या घरी पोहचलो तेव्हा ते तोंडावर पडलेल्या अवस्थेत होते, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं ज्याला बेडचा कॉर्नर लागला होता. डोक्याची जखम आणि रक्त जमा झालं होतं, खोलीत पुरेसा प्रकाश नव्हता. त्यासाठी मी सिवादासनच्या एका बाजूने वाकलो कारण भिंतीला असलेले लाइटचं स्विच ऑन करु शकेल, तेव्हा अचानक सिवादासनचा आवाज आला, मी दोनदा कान नीट लावून ऐकले, झोपलेल्या माणसाचा आवाज येतो तसा आवाज होता. मी तात्काळ पोलिसांकडे धावलो आणि तो माणूस जिवंत असल्याचं सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी आणि मी सिवादासनचे शरीर सरळ केले, तेव्हा त्यांच्या ह्दयाचे ठोके सुरु असल्याचं निदर्शनास आले, तेव्हा पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात आणलं, ब्लडप्रेशरच्या अटॅकमुळे ते खाली कोसळले असल्याचं रुग्णालयातून माहिती पडले. बेडचा कोपरा त्यांच्या डोक्याला लागल्याने जखम झाली आणि रक्त वाहू लागले. पण सुदैवाने सिवादासन यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की...
काँग्रेसमध्ये बंडखोरी का केली? सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केला खुलासा
सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये ‘जोकर’ने प्रवेश केलाय का? सायबर पोलिसांचं सतर्कतेचं आवाहन
चीनची अनोखी शक्कल; थर्डक्लास विमानं नेपाळला उच्चदरात विकली अन् कोट्यवधीचा चूना लावला
थाटामाटात लग्न लावले अन् वधूपित्यासह १७ जण कोरोनाबाधित आढळले; २०० पाहुण्यांवर गुन्हा