भारीच! चौथीलाच शाळा सोडली; अन् आता ८३ वर्षीय आजोबांनी तयार केली ४ भाषांची डिक्शनरी

By Manali.bagul | Published: January 10, 2021 04:01 PM2021-01-10T16:01:18+5:302021-01-10T16:08:50+5:30

Inspirational Stories in Marathi : ज्यांनी एक दोन नाही तर तब्बल ४ भाषेतील डिक्शनरी तयार केली आहे.

kerala school dropout creates 4 in 1 dictionary in four south languages south indian | भारीच! चौथीलाच शाळा सोडली; अन् आता ८३ वर्षीय आजोबांनी तयार केली ४ भाषांची डिक्शनरी

भारीच! चौथीलाच शाळा सोडली; अन् आता ८३ वर्षीय आजोबांनी तयार केली ४ भाषांची डिक्शनरी

googlenewsNext

(Image Credit- The better india)

सध्या डिजीटल साधनाांचा वापर वाढल्यामुळे एका क्लिकवर तुम्हाला हव्या त्या गोष्टींबाबत माहिती मिळवता येऊ शकते.  गुगल ट्रांसलेट्मुळे अनेक भाषा वाचता येऊ शकतात. पण ज्या लोकांकडे इंटरनेट किंवा अधुनिक साधनांचा अभाव आहे. त्यांच्यासाठी पुस्तकं आजसुद्धा खूप  महत्वाचे माध्यम आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाबद्दल सांगणार आहोत.  ज्यांनी एक दोन नाही तर तब्बल ४ भाषेतील डिक्शनरी तयार केली आहे.

केरळच्या तालासरी परिसरात वास्तव्यास असलेल्या ८३ वर्षीय नजात्तेला श्रीधरण यांनी दक्षिण भारतातील चार भाषांची डिक्शनरी तयार केली आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमची एक डिक्शनरी तयार केली आहे. १५० वर्षांपूर्वी १८७२ मध्ये हर्मन गंडर्ट यांनी पहिला मल्याळम, इंग्रजी डिक्शनरी तयार केली होती. आता श्रीधरण यांनी दक्षिण भारतात बोलल्या जात असलेल्या  ४ भाषांची डिक्शनरी तयार केली आहे. श्रीधरण यांनी दिलेल्या माहितीनुसार , ''प्रत्येक मल्याळम शब्दासाठी तुम्हाला  येथे कन्नड, तमिळ, तेलुगुमध्ये शब्द मिळतो. हे माझ्या मेहनतीचे फळ आहे.'' या कार्यात त्यांनी आपल्या आयुष्याची २५ पेक्षा जास्त वर्षे दिली आहेत. 

जिद्दीला सलाम! एका पाय नसूनही बॉडीबिल्डींगमध्ये कमावतीये नाव, कधी देत नव्हते कुणीही नोकरी...

श्रीधरण यांनी आपले शालेय शिक्षणही पूर्ण घेतले नव्हते. चौथीला असताना त्यांनी शाळा सोडली होती. पण डिक्शनरी तयार करण्याच्या कामासाठी त्यांची स्वप्रेरणा महत्वाची ठरली. त्यांनी सांगितले की, '' शाळा सोडल्यानंतर मी स्थानिक बिडी बनविण्याच्या फॅक्टरीत काम केले. बीडीच्या कारखान्यात काम करत असताना मी ईएसएलसी पास केली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. १९८४ पासून शब्दकोशावर काम करत होतो परंतु १९९४  मध्ये त्यांनी पीडब्ल्यूडी येथील नोकरी सोडून सेवानिवृत्ती घेतली त्यावेळी मी आपला सर्व वेळ शब्दकोशाकडे वळविला.''

वाह, शाब्बास! लॉकडाऊनच्या काळात दोन भावंडांनी लिहिले २१०० पानांचे रामायण

पुढे त्यांनी सांगितले की, ''मी माझ्या खोलीत तासनतास शब्दांवर काम करत बसायचो. मी स्वतःहून या चारही भाषा आधी व्यवस्थित शिकून घेतल्या. या डिक्शनरीसाठी मला प्रकाशकाची आवश्यकता होती. यादरम्यान मी अनेक प्रकाशक आणि संस्थानांना भेट दिली. त्यावेळी सगळ्यांनीच नकार दिला. अनेक चढ उतार आल्यानंतर केरलमध्ये सीनियर सिटिजन फोरमच्या सामुहिक प्रयत्नांनी नोव्हेंबर २०२० ला डिक्शनरी प्रकाशित झाली.''  या डिक्शनरीचे मुल्य १५०० रूपये असून ९०० पेक्षा जास्त पानांची ही डिक्शनरी आहे. 

Web Title: kerala school dropout creates 4 in 1 dictionary in four south languages south indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.