व्हॅलेंटाईन डे ला पत्नीने पतीला दिलं मोठं गिफ्ट, आपलं लिव्हर देऊन वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 04:49 PM2022-02-15T16:49:58+5:302022-02-15T16:50:54+5:30

Kerala : एका न्यूज एजन्सीनुसार, ही सर्जर कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी सकाळी ६ वाजता सुरू झाली होती. ही सर्जरी तब्बल १७ तास चालली.

Kerala : Wife donates liver to husband on valentines day | व्हॅलेंटाईन डे ला पत्नीने पतीला दिलं मोठं गिफ्ट, आपलं लिव्हर देऊन वाचवला जीव

व्हॅलेंटाईन डे ला पत्नीने पतीला दिलं मोठं गिफ्ट, आपलं लिव्हर देऊन वाचवला जीव

Next

केरळच्या (Kerala) कोट्टायममध्ये व्हॅलेंटाईन डे ला एका पत्नीने आपल्या पतीला लिव्हर डोनेट (Liver Donation) करून खऱ्या प्रेमाचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं. हे दुसऱ्यांदा आहे की, राज्यात कुणीतरी सरकारी हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट केलं आहे. ही घटना कुन्नमकुलमच्या वेलूर कोट्टापाडीची आहे. इथे ३९ वर्षीय प्रविजाने आपला पती सुबीशला लिव्हर डोनेट केलं.

एका न्यूज एजन्सीनुसार, ही सर्जर कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी सकाळी ६ वाजता सुरू झाली होती. ही सर्जरी तब्बल १७ तास चालली. या सर्जरी दरम्यान सर्वातआधी प्रविजाच्या लिव्हरचा साधारण ४० टक्के भाग काढण्यात आला. सोबतच सुबीशचं लिव्हरही काढण्यात आलं.  

यानंतर साडे पाच वाजता सुबीशच्या शरीरावर प्रविजाच्या लिव्हरचा भाग ट्रान्सप्लांट करण्यास सुरूवात केली. नंतर पुढील ५ तासात पूर्ण ऑपरेशन केलं. हे ऑपरेशन डॉक्टर आरएस सिंधुच्या नेतृत्वात २९ इतर डॉक्टरांच्या टीमने यशस्वीपणे केलं.
ऑपरेशननंतर सुबीशला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. एमसीएच अधिक्षक डॉ. टीके जयकुमार यांनी सांगितलं की, रात्री १०.३० वाजतापर्यंत सर्जरी पूर्ण झाली. एक तास त्यांना ऑब्जर्वेशननंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. सुबीशसाठी पुढील ४८ तास महत्वाचे आहेत.

याआधी गेल्यावर्षी उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये लिव्हरने काम करणं बंद केल्याने गंभीर रूपाने आजारी १४ वर्षीय एका मुलाला त्याच्या दोन मोठ्या बहिणींनी त्यांचं अर्ध अर्ध लिव्हर देऊन त्याचा जीव वाचवला. हे यशस्वी ऑपरेशन गुरूग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं. १४ वर्षीय अक्षतचं वजन ९३ किलो होतं, त्याच्या पोटात पाणी भरलं गेलं होतं आणि सूजही आली होती. 
 

Web Title: Kerala : Wife donates liver to husband on valentines day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.