ट्रिपल धमाका! ३५ वर्षानंतर घरात हलला पाळणा, ५५ व्या वयात महिलेने दिला तीन बाळांना जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:51 PM2021-08-10T12:51:37+5:302021-08-10T12:55:26+5:30
केरळच्या मुवाटुपुझा गावात ५५ वर्षीय एका महिलेने एकाचवेळी तीन बाळांना जन्म दिला आहे. महिलेच्या लग्नाला ३५ वर्षे उलटून गेली होती.
आई होण्याचा अनुभव आपल्या देशात एका ठराविक वयातच बघायला मिळतो. जसजसं वय वाढतं शारीरिक समस्याही होतात. त्यात समाजातही जास्त वयात बाळांना जन्म देण्याला चांगल्या नजरेने बघितलं जात नाही. पण यात विचारात आता बदल येत असल्याचं दिसतं.
केरळच्या मुवाटुपुझा गावात ५५ वर्षीय एका महिलेने एकाचवेळी तीन बाळांना जन्म दिला आहे. महिलेच्या लग्नाला ३५ वर्षे उलटून गेली होती. इतक्या वर्षात त्यांनी अनेकदा बाळासाठी प्रयत्न केले. पण आई होण्याचा आनंद त्यांना फारच उशीरा मिळाला. त्यांना बाळ हवं होतं ते त्यांचं स्वप्न आता पूर्ण झालं. ५५ वर्षीय सिसी आणि ५९ वर्षीय त्यांचे पती जॉर्जज एंटनी आनंदी आहेत.
सिसी या क्षणाला देवाचा आशीर्वाद मानतात. त्यांच्यानुसार, त्यांना त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर मिळालं आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कपलने सांगितलं की, 'आम्ही एका बाळासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रार्थना करत होतो. पण आता आम्हाला जुळे नाही तर तिळे मिळालेत'. सिसी यांचे तिन्ही बाळ व्यवस्थित आहेत. त्यांना २ मुले आणि एक मुलगी झाली आहे.
त्यांना उशीर भलेही लागला असेल, पण त्यांनी आशा सोडली नव्हती. प्रार्थना तर सुरू होतीच सोबतच त्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात होत्या आणि वेळोवेळी उपचार घेत होत्या. त्यांनी परदेशातही उपचार घेतलो. दोघांचं लग्न १९८७ मध्ये झालं होतं. जॉर्ज हे गल्फमध्ये काम करत होते.
सिसी म्हणाल्या की, लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांना बाळासाठी अनेक उपचार घेणे सुरू केले होते. सिसी म्हणाल्या की, आपला समाज असा आहे की, एखादी महिला आई होत नसेल तर तिच्याकडे वाईट नजरेने बघतात. अशात गेल्या ३५ वर्षांनी त्यांना अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या.