(Image Credit- Aajtak)
देव तारी त्याला कोण मारी! हे वाक्य अनेकदा तुमच्या कानी पडलं असेल. केरळचा एक १९ वर्षांचा मुलगा रिअल हिरो ठरला आहे. केरळच्या त्रिशूरचा रहिवासी असलेल्या १९ वर्षांच्या मुलानं ड्रोनच्या मदतीनं ४ मासेमारांचा जीव वाचवला आहे. हे चारही मासेमार खोल समुद्रात अडकले होते. ही घटना ५ जानेवारीची आहे. जेव्हा त्रिशूर जिल्यातील एका समुद्र किनारी असलेल्या थालिककुलम नावाच्या गावातून ४ मासेमार एका लहानश्या बोटीत बसून मासेमारीसाठी निघाले.
समुद्रात ११ मैल दूर पोहोचल्यानंतर अचानक त्यांची बोट तुटली आणि बोटीत बसलेले मासेमार बुडायला लागले. समुद्रात बुडण्याआधी मासेमारांनी आजूबाजूच्या मासेमारांना बचावासाठी आवाज द्यायला सुरूवात केली. ज्या लोकांनी या मासेमारांचा आवाज ऐकला होता. त्यांनी या मासेमारांना खूप शोधलं पण काही केल्या हे मासेमार मिळायला तयार नव्हते.
जिद्दीला सलाम! एका पायावर तिचा ३८०० किलोमीटर भारतभर प्रवास
१९ वर्षांचा देवांग सध्या इंजिनिअरिंगचा अभ्यास करत आहे. जेव्हा त्याला आपले वडीलसुद्धा त्यात बोटीत मासेमारीला गेल्याचे कळलं तेव्हा तो लगेचच समुद्र किनारी पोहोचला आणि त्यानं ड्रोनच्या मदतीनं मासेमारांना शोधण्याबाबत इतरांना सांगितले. स्थानिक आमदाराची मदत घेतल्यानंतर देवांग एका बोटीच्या मदतीनं समुद्रात उतरला आणि ११ मैल लांब पोहोचल्यानंतर त्यानं आपला ड्रोन उडवायला सुरूवात केली.
शाब्बास पोरा! रस्त्यावर भाजी विकता विकता अभ्यास करणाऱ्या मुलाला पाहून IAS अधिकारी म्हणाले...
ड्रोनच्या मदतीनं त्यानं चारही मासेमारांचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. सगळे मासेमार तासनतास पाण्यात राहल्यामुळे थकले होते आणि खूप अशक्तही झाले होते. अनेक तासांपर्यंत ते पाण्यात राहिले. शेवटी देवांगने प्रसंगावधान दाखवत चारही मासेमारांना वाचवले. या घटनेनंतर देवांगला एक स्थानिक हिरो म्हणून ओळख मिळाली आहे. देवांगवर संपूर्ण गावातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.