शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

KGF म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्सचा खरा इतिहास, सिनेमापेक्षा वेगळं आहे सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 1:59 PM

केजीएफमधून कधीकाळी देशातील ९५ टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. कोलार १९व्या शतकात चर्चेत आलं. कारण तेव्हा इथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास १७०० वर्ष जुना आहे.

बंगळुरूच्या पूर्वेला साधारण १०० किलोमीटर अंतरावर एक असा परिसर आहे ज्याला 'लिटिल इंग्लंड' नावाने ओळखलं जातं. कधी हे इंग्रजांनी वसवलेलं शहर होतं. इथे गोल्फ क्लब आणि स्वीमिंग पूल असलेले सोशल क्लबही होते. त्यासोबत जगप्रसिद्ध हॉस्पिटल, शाळा आणि सिनेमागृह होती. २०व्या शतकात सोन्याच्या व्यापाराशिवाय हे शक्यही नव्हतं. ज्या ठिकाणाबाबत आपण बोलतोय ते आहे कोलार गोल्ड फील्ड्स. याला केजीएफ नावानेही ओळखलं जातं. केजीएफची चर्चा याच नावावरून आलेल्या सिनेमामुळे अधिक होऊ लागली आहे. या सिनेमातही गोल्ड माइन्सची पार्श्वभूमी दाखवली आहे. पण कथा काल्पनिक आहे. कथा मोडून तोडून दाखवली आहे. या केजीएफचा म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्सचा इतिहास वेगळाच आहे. तोच आज जाणून घेऊ.....

केजीएफमधून कधीकाळी देशातील ९५ टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. कोलार १९व्या शतकात चर्चेत आलं. कारण तेव्हा इथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास १७०० वर्ष जुना आहे. इसपू. ३५०-१००० दरम्यान कर्नाटकावर गंगा वंशाचं शासन होतं आणि तेव्हा कोलार त्यांची राजधानी होती. राजा या ठिकाणाहून गेल्यावर कुवालाला-पुरावेश्वर हे पुस्तक घेऊन गेले. १००४ मध्ये कोलारवर चोल वंशाचं शासन होतं. रेकॉर्डमधून समोर येतं की, कोलार सोन्याच्या खाणीतून काढलेलं सोनं चोल राजवंशाच्या प्रसिद्ध पूमपुहार बेटावर आणलं जात होतं. तेथून ते इतर ठिकाणी पाठवलं जात होतं.

(Image Credit : pinterest.com)

इंग्रज येण्यापूर्वी खाणीतून जेवढं सोनं काढण्यात आलं होतं ते अर्धविकसित होतं. लोकांचे छोटे छोटे समूह लोखंडाच्या औजारांनी आणि तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात जमीन खोदत होते. अशात इंग्रज सेना अधिकारी जॉन वॉरन याची नजर या खाणींवर पडली. त्याला या खाणींचं महत्व समजलं.

१७९९ मध्ये श्रीगंगापट्टनममध्ये इंग्रजांच्या हातून टीपू सुलतान मारला गेल्यावर इंग्रजांनी टीपूचे भाग मौसरला सोपवण्याचा निर्णय झाला.  पण त्यासाठी जमिनीचा सर्व्हे महत्वाचा होता. वॉरन तेव्हा सेनेच्या ३३व्या बटालियनचा कमांडर होता. या कामासाठी त्याला कोलारला बोलवण्यात आलं. १८०२ मध्ये म्हैसूरच्या सीमेचं काम सुरू झालं. त्याने खाणीत सुरू असलेलं काम पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की, ५६ किलो मातीतून फारच थोडं सोनं निघत होतं. त्याने विचार केला की, हे काम प्रोफेशनल लोकांना दिलं तर सोनं जास्त निघू शकतं. 

तेव्हा सहा दशकं अनेक लोकांनी सोनं शोधण्यात आपली नशीब आजमावलं. अनेक शोध केले गेले. पण कुणालाही सोन्याचा मोठा खजिना मिळाला नाही. या स्थितीत १८७१ मध्ये बदल झाला. इंग्रजांच्या सेनेतून रिटायर झालेला आयरलॅंडचा मायकल फिट्जगॅराल्ड लॅवलेने बंगळुरू छावणीला आपलं घर बनवलं. त्याचा खाणींमधील इंटरेस्ट वाढला. जॉन वॉरनचा जुना रिपोर्ट वाचून त्याने खाणीत काम करायला सुरूवात केली.

आपल्या अनुभवाच्या मदतीने लॅवलेने खोदकामासाठी काही जागा निवडल्या. दोन वर्षांपेक्षा जास्त शोध केल्यानंतर १८७३ मध्ये महाराजाच्या सरकारकडून त्याने खोदकामासाठी परवानगी घेतली. त्याला २० वर्षांसाठी एक भाग मिळाला आणि त्याने इथे आधुनिक पद्धतीने खोदकाम सुरू केलं.पण लवकरच लॅवलेकडे असलेले पैसे संपले आणि १८८० मध्ये लंडनच्या मायनिंग फर्म टॅलर अॅन्ड सन्सने कोलार खाण हाती घेतली. त्यांनी इतिहास बदलून टाकला. तो आपल्यासोबत कोलारमध्ये आधुनिक मशीन घेऊन आला आणि खोदकाम सुरू केलं. एकेकाळी कोलारची खाण सर्वात खोल आणि सर्वात जास्त सोनं देणारी खाण होती. कोलार गोल्ड माइन्स हे भारतातील अशा पहिल्या शहरांपैकी होतं जिथे वीज आली होती.

१९०० मध्ये म्हैसूरच्या महाराजांना कावेरी नदीवर पानचक्की लावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर इथे वीज वीज पोहोचू लागली. या कामासाठी ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीहून मशीन्स मागवण्यात आल्या होत्या. या मशीन हत्ती आणि घोडे खेचत होते. त्यावेळी बंगळुरू आणि म्हैसूरमध्येही वीज पोहोचली नव्हती. वीज आल्यामुळे खाणीत लिफ्ट सुरू झाल्या.

(Image Credit : Google)

खोदकाम जोरात सुरू झालं आणि संपत्ती येऊ लागली होती. अशाप्रकारे पडीत जमीन असलेला कोलार शहर १९३० पर्यंत एक समृद्ध शहर बनलं. पण एकीकेड इंग्रज शाही जीवन जगत होते तर खाणीत काम करणारे भारतीय मजूरांची स्थिती फारच बेकार होती. इंग्रज बंगल्यात रहायचे तर भारतीय मजूर मातीच्या खोल्यांमध्ये. इथे उंदरांचा सुळसुळाटही होता. शक्य तेवढं सोनं काढल्याने कोलार गोल्ड माइन्सची नियती बदलली. यूरोपहून आलेले खनन तज्ञ घाना आणि पश्चिम आफ्रिकेत खोदकामासाठी गेले आणि कोलार गोल्ड फील्ड्स २००१ मध्ये बंद पडली. या खाणीत आज पाणी भरलं आहे. आता ही खाण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सkgf 2केजीएफhistoryइतिहासKarnatakकर्नाटक