जर तुम्ही बॉडीबिल्डींग करत असाल तर सिथॉलबाबत तुम्ही ऐकलं असेलच. अनेक तरूण बॉडी बनवण्यासाठी इंजेक्शन घेतात. रशियाचा kirill Tereshin ने सुद्धा असंच केलं. त्याने घातक सिथॉल शरीरात इंजेक्ट केलं, पण त्याचा परिणाम उलटाच झाला. सामान्य बॉडीबिल्डर्सपेक्षा त्याच्या बायसेप्सची साइज जास्त झाली.
त्याच्या बायसेप्सची साइज इतकी झाली की, लोकांना त्याला पाहून लोकप्रिय कार्टून 'पोपाय'ची आठवण झाली. नंतर तो पोपाय नावानेच ओळखला जाऊ लागला. पण नुकत्याच झालेल्या एका फाइटमध्ये लोकांना कळालं की, त्याचे डोले काहीच कामाचे नाहीत.
रशियाचा हा पोपाय त्याची पहिली MMA फाइट लढली. पण इथे त्याचे मोठ-मोठाले डोले काही कामात आले नाहीत. कारण केवळ तीन मिनिटांमध्ये तो चित झाला. ४३ वर्षांच्या Oleg Mongol ने या २३ वर्षीय बॉडीबिल्डरला हरवले.
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, Kirill Tereshin ने त्याचे बायसेप्स केवळ १० दिवसात १० इंच वाढवले होते. यासाठी त्याने सिथॉलचे इंजेक्शन घेतले होते. पण आता डॉक्टरांनी त्याला इशारा दिला आहे की, हे केमिकल त्याच्यासाठी घातक ठरू शकतं.