पृथ्वी महासागरांनी वेढलेली आहे. सगळ्यांनाच माहीत आहे की, पृथ्वीचा एकूण 70 टक्के भाग पाण्यात आहे आणि केवळ 30 टक्के जमीन आहे. पण यातील जास्तीत जास्त पाणी खारं आहे. आपण सगळेच जमिनीतून पाणी काढून पितो. पण तेही फार वेगाने संपत आहे. असं सांगितलं जातं की, पृथ्वी कोरडी पडत आहे. एकना एक दिवस पाणी संपेल. पण खरंच असं होणार आहे का? पृथ्वीच्या आत किती पाणी आहे? वैज्ञानिकांनी याबाबत रिसर्च केला.
लाइव साइन्सच्या रिपोर्टनुसार, सस्केचेवान विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी 2021 मध्ये एक रिसर्च केला. याद्वारे त्यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, पृथ्वीच्या आता माती किंवा दडगांमध्ये किती पाणी लपलेलं आहे. तेव्हा समजलं की, महासागर हे पाण्याचा सगळ्यात मोठा भांडार आहेत. ज्यात साधारण 312 मिलियन क्यूबिक मैल पाणी भरलेलं आहे. मात्र, पृथ्वीच्या आतही पाणी कमी नाही. पृथ्वीच्या कोरमध्ये जवळपास 43.9 मिलियन क्यूबिक किलोमीटर पाणी आहे. जे पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या एक चतुर्थांश आहे. यापेक्षा फार कमी पाणी म्हणजे 6.5 मिलियन क्यूबिक पाणी अंटार्कटिकेतील बर्फात लपलं आहे. महत्वाची बाब म्हणजे पृथ्वीच्या खालील जास्तीत जास्त पाणी पिण्यायोग्य आहे.
जर्नल जियोफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, जमिनीतील जे पाणी आपण काढतो ते वर्षानुवर्ष जमिनीच्या खाली आहे. यातील बरंच पाणी दरवर्षी आपण काढतो. पण पाऊस आणि इतर सोर्समुळे लेव्हल कायम राहते.
नेचर जियोसायन्स जर्नलमध्ये 2015 मध्ये एक रिपोर्ट पब्लिश झाला होता. त्यात अंदाज लावण्यात आला होता की, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 2 किलोमीटरमध्ये 22.6 मिलियन क्यूबिक किलोमीटर पाणी भरलेलं आहे. पण आता जो रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात सांगण्यात आलं की, पाणी 23.6 मिलियन क्यूबिक किलोमीटर आहे.पाण्याची समस्या दूर होऊ शकते
रिसर्चचे लेखक ग्रांट फर्ग्यूसन यांनी लाइव्ह सायन्सला सांगितलं की, हे जास्तीत जास्त ताजं पाणी आहे. याचा उपयोग पिण्यासाठी केला जाऊ शकतो. याउलट जे पाणी फार खोलात आहे ते खारं असतं. काही ठिकाणी तर ते फार जास्त खारं आहे. पण ते तेवढ खराब नाही. जेवढं महासागरातील असतं. त्यांनी सांगितलं की, जर यावर आणखी रिसर्च केला गेला तर पृथ्वीवरील पाण्याच्या समस्येचं समाधान निघू शकतं.