आपल्या देशाचा इतिहास फारच रोमांचक राहिला आहे. इतिहासाच्या पानांवर केवळ वीर राजे-महाराजेच नाही तर अनेक राण्यांचीही नावे नोंदवली आहेत. अशा राण्या ज्यांनी मातृभूमीच्या मान-सन्मानासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यातीलच एक राणी म्हणजे हाडीराणी.
मेवाडच्या हाडीराणीने आपल्या मातृभूमीसाठी जे केलं ते विसरलं जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर आजही त्यांच्या शौर्याच्या कथा अनेक लोकांची मने विचलित करतात. १६व्या शतका दरम्यान हाडीराणीचा विवाह सलूंबरचे राव रतन सिंह यांच्यासोबत झाला होता. दोघांच्या लग्नाला एकच दिवस झाला होता आणि युद्धाने त्यांचा दरवाज्यावर धडक दिली.
हे युद्ध किशनगढचे राजा मान सिंह आणि औरंगजेब यांच्यात होणार होतं. औरंगजेबने आक्रमणाची पूर्ण तयारी केली होती. इकडे राजा राजसिंह, औरंगजेबाला किशनगढाच्या आधीच रोखण्याचा विचार करत होते. म्हणून त्यांनी ही मोठी जबाबदारी राव रतन सिंह यांच्याकडे सोपवली. राव रतन सिंह यांच्या लग्नाला एकच दिवस झाला होता आणि अशाप्रकारे राणी पासून दूर होणं त्यांना सलत होतं. त्यांचं राणी हाडीवर खूप प्रेम होतं आणि त्यांच्यापासून दूर जावं लागत असल्याने दु:खी होते. (हे पण वाचा : जेव्हा एका मुलीच्या प्रेमात १०० फटके खायलाही तयार होते महान राजा रणजीत सिंह)
युद्धादरम्यान मैदानात जाण्यापूर्वी राव रतन सिंह यांना राणीची एखादी निशाणी सोबत न्यायची होती. जेणेतरून त्यांना वेगळे झाल्याची जाणीव होऊ नये. यामुळे त्यांनी युद्धावर जाण्याआधी सैनिकांना राणीची निशाणी आणण्यास सांगितलं. राव रतन सिंह यांच्या आदेशावरून सैनिक निशाणी आणण्यासाठी राणीकडे गेला. हाडीराणी यांना समजलं होतं की, त्यांचे पती प्रेम मोहाच्या बाहेर निघत नाहीयेत. ज्यामुळे त्यांना युद्धाच्या मैदानात जाण्यास अडचण येत होती.
मातृभूमिची रक्षा आणि मान-सन्मानासाठी हाडी राणी यांनी आपलं शिर कापून सैनिकांकडे दिलं. जेणेकरून त्यांचं पतीचं लक्ष प्रेमावर नाही तर मातृभूमीच्या रक्षणावर असावं. हाडी राणीने स्वत:च्या प्राणांचं बलिदान देऊन आपल्या पतीला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि अमर झाली.