शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 12:23 PM

जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात.

(Image Credit : quora.com)

जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. सामान्य सिनेमांमध्ये एकच पद्धत ठोबळपणे दाखवली जाते. दोन प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. एक म्हणजे दफन केलं जातं नाही तर अग्नी दिलं जाते. हे हिंदू किंवा मुस्लिम धर्मात केलं जातं. पण पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची एक वेगळी प्रथा आहे. पारसी लोकांमध्ये व्यक्तीच्या पार्थिवाला ना दफन करतात ना अग्नी देतात. यासाठी त्यांची एक वेगळीच प्रथा आहे. 

(Image Credit : scroll.in)

पारसी हा बराच जुना धर्म आहे आणि या धर्मात ३ हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला 'दोखमेनाशिनी' असे म्हणतात. व्यक्तीचं निधन झालं की, मृत व्यक्तीचं शरीर 'दोखमेनाशिनी' साठी शरीर एकांतात नेलं जातं. आणि इथे ते व्यक्तीच्या मृत शरीराला गिधाडांसाठी सोडतात. 

भारतात पारसी लोक हे मुंबई शहरात सर्वात जास्त राहतात. मुंबईत पारसी लोकांची स्वतंत्र स्मशान भूमी आहे. या स्मशानभूमीला 'टॉवर ऑफ साइलेन्स' असं म्हटलं जातं. इथे मृत शरीराला आणून ठेवले जातं आणि मग गिधाड येऊन ते शरीर खातात. त्यांच्यामते असं केल्यावरच त्यांना मुक्ती मिळते. पण आता ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे.

पूर्वी ही स्मशान भूमी अत्यंत शांत भागात असायची. पण शहरीकरणाने आता पूर्वीची शांतता राहिली नाही. तसेच गिधाड व इतर पक्षी अर्धवट मृत्यदेह खात असल्याने त्यांची दुर्गंधी येते. त्यामुळे जवळपास च्या रहिवाशी लोकांनी पण याला विरोध केला. तसेच गिधाडांची संख्याही आता कमी झाली. 

त्यामुळे पारसी समाजाच्या अंत्यविधीला अडचणी निर्माण होतात. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होतोय. आजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे २००७ मध्ये १०० च्या कमीच गिधाड राहिले आहेत, अशी नोंद होती. त्यामुळे पारसी समाजात सध्या अंत्यविधी साठी वेगळा पर्याय शोधावा लागतो आहे. आता अंत्यविधीसाठी पारसी लोकांना सुरतला जावं लागतं. आता गिधाड नामशेष झाल्याने पारशी धर्मियांना अंत्यविधीसाठी थेट गुजरातमधील सुरत गाठावे लागते. निसर्गाचे जीवनचक्र बदलल्याने पारशी समाजबांधवांना प्रेतासह चारशे किलोमीटर लांबीच्या अंत्ययात्रेचा प्रवास करावा लागतो. स्वतंत्र प्राप्तीनंतर शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात अव्वल असलेल्या पारशी धर्मियांना मुंबईत हक्काची स्मशानभूमी आहे. मात्र, असे असतानाही त्यांना तेथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत.

काही लोक हे स्पष्टपणे म्हणतात की, पारसी लोकांची ही अंत्यसंस्काराची प्रथा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर पारसी सिद्धांतवाद्यांचं असं मत आहे की, ते याशिवाय दुसरी कोणतीही प्रथा स्विकारू शकत नाहीत. प्रथा बदलण्याबाबत अनेक पारसी लोक सहमत नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जावं लागतं.

 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके