२०१९ मध्ये सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी घडल्या. ज्यांनी तुम्हाला खळखळून हसवलं तसंच असे काही लोकं टिकटॉक आणि फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल झाले. ज्यांची विनोदी शैली आणि खासियत तुम्हाला नक्की लक्षात राहील. चला तर मग जाणून घेऊया २०१९ या वर्षात सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्हायरल झालेल्या व्यक्ती आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट बद्दल.
हार्मोनियम चाचा
एका पाकिस्तानी कॉमेडी शो मधील हा फोटो आहे. या फोटोवर खूप मिम्स तयार करण्यात आले होते. हा मुलाखतीदरम्यानचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या चाचांना हार्मोनियम वाजवता येत नाही तरी ते धून वाजवत होते.
रातोरात प्रसिद्ध झालेली रानू मंडल
आपल्या अनोख्या आवाजमुळे सोशल मीडिया वर रातोरात प्रसिध्द झालेली रानू मंडल हिने कमी वेळात आपला भरपूर चाहतावर्ग मिळवला. तसंच रानूमंडलची सुरूवातीला खूप स्तुती केली गेली. त्यानंतर अनेक वाद निर्माण झाले. मग रानूवर आधारीत बरेच मिम्स तयार करण्यात आले होते. इतकेच नाही तर रानूशी निगडीत असणारी प्रत्येक गोष्ट तिचे कपडे, तसंच तिचा मेकओवर यांवर आधारीत मीम्सनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता.
हिंदूस्थानी भाऊ
विकास जयराम पाठक यांलाच हिंदूस्थानी भाऊ म्हटलं जातं. या भाऊच्या व्हिडीओला इन्स्टाग्रावर खूप प्रसिध्दी मिळाली. तसंच आक्रमक असलेला भाऊ बीगबॉस १३ मध्ये सुध्दा प्रेक्षकांना पहायला मिळाला.
पाकिस्तानी फॅन
हा सगळ्यात जास्त हसायला लावणारा आणि खूपच फनी असलेल्या २०१९ च्या पात्रांपैकी एक होता. २०१९ चा भारत विरुध्द पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर एका पाकिस्तानी फॅनची आलेली ही रिअॅक्शन खूपच व्हायरल झाली होती.
लँण्ड कराके दे भाई
या वायरल झालेल्या फोटोमध्ये एक विपिन साहू नावाचा माणूस पॅराग्लाईडींग करत आहे. हा व्हिडीओ आपण सगळयांनी पाहिलाच असेल. हा माणूस जमिनीपासून खूप उंचावर आला आहे. तसंच तो घाबरल्यामुळे आपल्या इन्स्ट्रक्टरला ५०० रुपये आणखी घेऊन खाली उतरवण्यातची विनंती करत होता.
भावांमधल प्रेम
२०१९ मध्ये एक व्हिडीयो व्हायरल झाला होता. त्यात मोठ भाऊ आपल्या लहान भावासाठी फ्राईड राईस तयार करत होता. हा व्हिडीओ खूपच भावनीक असून सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता. यातून एक मोठा भाऊ आपल्या लहान भावाची कशाप्रकारे काळजी घेत आहे. ते दिसून आलं.
पीछे तो देखो
अहमद शहा नावाचा एक पाकिस्तानी मुलगा भन्नाट व्हायरल झाला होता. पठाणाचा मुलगा असल्याचं या व्हिडीयोतून दिसून येते. पीछे तो देखो असं तो म्हणत होता. हा मुलगा त्याच्या क्यूटनेस आणि हावभावांमुळे सर्वाधिक व्हायरल झाला.
अँग्री पाकिस्तानी मिम्स
क्रिकेट वर्ल्ड कपच्या दरम्यान सरीम अख्खतर नावाच्या एका व्यक्तीने आपलं एक GIF सोशल मिडीय़ावर शेअर केलं होतं. त्यात पाकिस्तानी टिमच्या पराभवाद्दल त्यांच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव हे पाहण्यासारखे होते. या माणसाच्या रिअॅक्शनने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला .
RCB गर्ल
दिपीका गोशाल हीला RCB गर्ल असं म्हटलं जातं. आइपीएलच्या मॅचेस चालू असताना काही वेळासाठी मोठ्या पडद्यावर दिसलेली ही लाल टॉपमधली मुलगी खूप चर्चेत आली होती. तिचे इंस्टाग्रामवर ५००० फॉलोअर्स होते. त्यानंतर त्यांची संख्या २ लाख ८० हजारांवर पोहोचली.