शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

भारतातील या गुहेमध्ये आहे सोन्याचा भांडार? पण दरवाजा कुणीच उघडू शकलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:41 PM

Son Bhandar : या गुहेमध्ये खजिना लपवल्याचे अनेक किस्से सांगितले जातात. या गुहेत कोट्यावधी रूपयांचा खजिना लपवला आहे. पण आजपर्यंत एकही मनुष्य या खजिन्यापर्यंत पोहोचू शकला नाही.

Son Bhandar : जगभरात अशा अनेक गुहा आहेत ज्यांच्या रहस्यांबाबत आजही संशोधकांना काही कळू शकलेलं नाही. या गुहा आजही रहस्य बनून आहेत. भारतातही अशा गुहा आहेत. ज्यातील गुहेबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या गुहेमध्ये खजिना लपवल्याचे अनेक किस्से सांगितले जातात. या गुहेत कोट्यावधी रूपयांचा खजिना लपवला आहे. पण आजपर्यंत एकही मनुष्य या खजिन्यापर्यंत पोहोचू शकला नाही.

काही रिपोर्ट्सनुसार, बिहारच्या राजगीरमध्ये दोन आर्टिफिशिअल गुहा आहेत. एक गुहेबाहेर मौर्यकालीन कलाकृती सापडल्या आहेत. तेच दुसऱ्या गुहेच्या प्रवेशद्वारावर गुप्त राजवंशाच्या भाषेत किंवा चिन्हामध्ये काही शिलालेख सापडले आहेत. 

रिपोर्टनुसार, या गुहांची निर्मिती जैन मुनींनी केली होती. या गुहांचं निर्माण चार शताब्दी इ.पू सांगितलं जातं. तेच एका गुहेबाहेर विष्णुची मूर्ती आणि जैन कलाकृती बघायला मिळतात. 

काही संशोधकांनी या गुहांचा अभ्यासही केला. तर निष्कर्ष असा निघाला की, या गुहांचा संबंध बौद्ध धर्माशी आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या गुहांना सोन्याचा भांडार म्हटलं जातं. हे आताच नाही तर फार पूर्वीपासून तशी चर्चा होत आहे. आता या गुहांना सोन्याचा भांडार म्हटलं जातं असा प्रश्न तुम्हाला पडणं शक्य आहे.

काही कथांनुसार असे सांगितले जाते की, या गुहांच्या आत सोनं भरलेलं आहे. या सोन्याच्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे. पण आजपर्यंत त्या मार्गापर्यंत कुणी पोहोचू शकलं नाही. काही लोकांचं असंही मत आहे की, इथे जरासंध किंवा बिंबिसारचा खजिना लपवलेला आहे. कारण गुहांपासून काही अंतरावर तुरूंग आहे जिथे अजातशत्रूने आपले वडील बिंबिसारला बंदी बनवलं होतं. इतकंच नाही तर गुहेच्या भींतीवर काही गुप्त शिलालेखही आहेत. जे आजपर्यंत कुणी वाचू शकले नाहीत. 

लोकांचा असा समज आहे की, जे लोक हे वाचू शकतील त्यांना खजिन्याचा मार्ग सापडेल. पण आजपर्यंत असं झालेलं नाही. अनेक लोकांनी आत जाऊन खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. इंग्रजांनी तर तोफगोळ्यांनी गुहेची भींत तोडण्याचा प्रयत्न केला. पण तेही जमलं नाही. त्यामुळे या गुहेचं रहस्य आजही रहस्य बनूनच आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके