Knowledge: जेव्हा मोठ्या देशांचा विषय निघतो तेव्हा चीन, रशिया आणि अमेरिका यांचा उल्लेख होते. पण आकाराने सगळ्यात मोठा देश कोणता आहे हे फारसं कुणाला माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
जगभरात एकूण 195 देश आहेत. इतिहासात अनेक मोठे देश छोट्या-छोट्या देशांमध्ये विभागले गेले आणि अनेक छोटे देश विलीन झाल्यावर काही मोठे देश बनले. पण यातील कोणता देश आकाराने सगळ्यात मोठा आहे? असा प्रश्न तुम्हाला कधीना कधी पडला असेलच.
रिसर्चमधून समोर आलं आहे की, मोठ्या देशांमध्ये छोट्या देशांच्या तुलनेत जास्त भौगोलिक, जलवायु आणि जैविक विविधता असते. पण हे जाणून घेणं फार रोचक ठरेल की, आकाराने कोणता देश सगळ्यात मोठा आहे.
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की, क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया सगळ्यात मोठा देश आहे. याला आधी सोव्हिएत संघ या नावाने ओळखलं जात होतं. या देशाचं क्षेत्रफळ फार जास्त आहे. याला तुम्ही जगाचा एक तृतीयांश भागही म्हणू शकता. रशियाचं अजूनही उत्तर आशिया आणि पूर्व यूरोपच्या मोठ्या भागावर नियंत्रण आहे.
रशिया यूरोपिय महाद्वीपातील सगळ्यात मोठा देश आहे. जो आशियाला लागून आहे. याचं क्षेत्रफळ जवळपास 17.098 मिलियन वर्ग किलोमीटर आहे. जे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 11% आहे. हा देश जगातील महाशक्ती म्हटला जातो. जर रशियाने तेल आणि गॅस देणं बंद केल तर जगातील अनेक देशांमध्ये अंधार होईल. चीनसारखीच रशियाची सीमाही 14 देशांना लागून आहे. तेच या देशाची लोकसंख्या साधारण 14 कोटी आहे. रशियात अनेक खनिज संपत्ती आहेत. पण या देशाचा जास्तीत जास्त भाग अजूनही वापरात नाही. वर्षभर बर्फवृष्टी होत असल्याने या देशाला जगातील सगळ्यात देशांपैकी एक मानलं जातं.
रिपोर्टनुसार, कॅनडा जगातील दुसरा सगळ्यात मोठा देश आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात असलेल्या या देशाचं क्षेत्रफळ जवळपास 9.984 मिलियन वर्ग किलोमीटर आहे. हा देश उत्तर अमेरिकन महाद्वीपाचा 41 टक्के आणि पृथ्वीच्या एकूण जागेपैकी 6.7 टक्के भाग घेरून आहे.
पण या देशाची लोकसंख्या फार कमी आहे. इथे प्रति वर्ग किलोमीटरवर केवळ 4 लोक राहतात आणि एकूण लोकसंख्या 3.5 कोटी आहे.