Earth Landmark : पृथ्वीच्या अनेक रहस्यमय आणि हैराण करणाऱ्या गोष्टी नेहमीच समोर येत असतात. जगात कितीतरी देश आहेत. त्यांच्याबाबतही अनेकांना जाणून घेण्याची उत्सकता असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, पृथ्वी मधोमध कोणता देश आहे? तिथे लोक कसे राहतात? तेथील वातावरण कसं असेल? आज आम्ही तुम्हाला या देशाबाबत सांगणार आहोत. जे याआधी तुम्हाला माहीत नसेल. हे एक असं ठिकाण आहे जिथे कधीकाळी चारही बाजूने सोनंच सोनं होतं. यासाठी अनेक युद्धेही झालीत.
ऑनलाइन प्लॅटफार्म कोरावर याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. सायनच्या दृष्टीने बघायचं तर पृथ्वीच्या मधोमध कोणताही देश नाही. पण पृथ्वीच्या सेंटर सगळ्यात जवळ जो देश आहे तो आहे घाना. घाना हा देश पृथ्वीच्या सेंटरपासून केवळ 380 मैल दूर आहे.
याच कारणाने सायंटिस्ट या देशाला पृथ्वीचा लॅंडमार्क मानतात. पण आफ्रिका महाद्वीपातील या देशाचा इतिहास फारच रोमांचक आहे. पृथ्वीच्या मधोमध असल्याने येथील वातावरण इतर देशांच्या तुलनेत फार जास्त गरम असतं. मे-जूनमध्ये तर तापमान इतकं वाढतं की, घरातून बाहेर निघाले तर त्वचा भाजली जाईल.
कधीकाळी फार धनवान होता हा देश
या देशाची एक आणखी खास बाब म्हणजे कधीकाळी हा देश खूप संपत्ती असलेला देश होता. इथे सगळीकडे सोन्याच्या खाणी होत्या. असंही सांगितलं जातं की, इथे इतकं सोनं होतं जगभरात वाटलं जाऊ शकलं असतं. हे सोनं मिळवण्यासाठी पोर्तुगाल आणि इंग्रजांमध्ये अनेक युद्धं झालीत. पण येथील लोकांची लाइफस्टाईल फारच वेगळी आहे. येथील लोक तुम्हाला अनेकदा रंगीबेरंगी कपडे घातलेले दिसतील. इथे जगातील सगळ्यात मोठा मानव निर्मित लेक वोल्टा (Lake Volta) आहे.