शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

काय सांगता! 3 कोटी रूपयांना विकला जातो हा साप, पण याला ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 3:43 PM

Rare Snake : मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो.

Rare Snake : एका दुर्मिळ प्रजातीच्या सापाची तस्करी केल्या जात असल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. या सापाला मांडूळ असंही म्हटलं जातं. मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो. चला जाणून घेऊ या सापाविषयी आणखी काही खास गोष्टी....

कुठे राहतो हा साप?

हा साप जास्त करून वाळूमध्ये राहतो. अ‍ॅनाकोंडाप्रमाणे या सापाचे डोळे डोक्यावर असतात. शिकारीसाठी हा साप वाळूमध्ये स्वत:ला लपवतो आणि केवळ त्याचं डोकं वर राहतं. शिकार जवळ येताच त्यावर हल्ला करतो. परदेशात अनेकजण हा साप पाळतात सुद्धा. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.

प्रजननाचं माध्यम

मांडूळ सापांमध्ये प्रजनन मादा द्वारे अंडी देऊन होतं. जन्मावेळी सापाची लांबी आठ ते दहा इंच इतकी असते. त्यांचा प्रजननाचा काळ हा पानझळ किंवा थंडीच्या दिवसात असतो. 

कुठे आढळतात हे साप?

या सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आढळून येतात. एक प्रजाती उत्तर अमेरिकेतील मुख्य रूपाने प्रशांत महासागराच्या तटावर आढळून येते. एक प्रजाती यूरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये आढळते. तर भारतात आणि आफ्रिकेतही एक प्रजाती आढळते.

काय खातात आणि कशी करतात शिकार?

इतर सापांप्रमाणेच हा साप देखील मांसाहारीच आहे. या सापांच्या राहण्याच्या ठिकाणाच्या आधारावर शिकार वेगवेगळे असतात. तसे हे साप जास्त करून उंदीर, पाल, बेडूक, ससे इत्यादी शिकार करतात. वाळूच्या खाली लपून हा साप शिकारीची वाट बघतो. शिकार जवळ आल्यावर आपल्या धारदार दातांनी त्यावर हल्ला करतो. तसेच शिकार बेशुद्ध होईपर्यंत त्यांचं रक्त पित राहतो.

कशासाठी वापरतात?

असे म्हणतात की, या सापाचा वापर कॅन्सरच्या उपचारासाठी आणि लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. याने इरेक्टाइल डिस्फंक्शन ही समस्या दूर होत असल्याचं बोललं जातं. त्यासोबतच सांधेदुखीवरही याचा वापर केला जातो. तर मलेशियात या सापाबाबत एक अंधविश्वास प्रचलित आहे. लोक इथे मानतात की, लाल मांडूळ साप व्यक्तीचं नशीब चमकवू शकतो. तसेच या सापाची कातड्याचा वापर कॉस्मेटिक्स, पर्स, जॅकेटसाठीही केला जातो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेsnakeसाप