नेदरलँडच्या हॉलँडमधील ग्रामीण भागातून एक ट्रेंड व्हायरल होत आहे. हा ट्रेंड रुवर या नावाने व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जगभरात गाईला मिठी मारण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. (डच भाषेत 'Koe Knuffelen' शब्द आहे. ज्याचा अर्थ गाईला मिठी मारणं'Cow Hugging') या देशातून हा ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर जगभरातील लोक हा ट्रेंड फॉलो करताना दिसून येत आहेत. याचा फायदा असा की, गाईला मिठी मारल्यामुळे मानसिक ताण दूर होतो. तसंच पाळीव प्राण्यांच्या सहवासात राहिल्यानं ताण तणाव जास्त येत नाही. मन हलकं झाल्याप्रमाणे वाटते असा दावा केला जात आहे.
थेरेपी एनिमल ही संकल्पना सगळ्यांनाच माहिती आहे. कोरोनाच्या माहामारीमुळे लोकांना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच हा प्राण्यांना मिठी मारण्याचा हा ट्रेंड व्हायरल होत आहे. या थेरेपीमागचं कारण माहीत झाल्यानंंतर तुम्हालाही याचा आनंद होईल.
खरंच गाईला मिठी मारल्यानंतर बरं वाटतं?
आपल्याला माहीत असायला हवे, की आलिंगन देण्यासाठी सर्वाधिक दयाळू पाळीव प्राणी गाय हाच आहे. 2007 मध्ये एका अभासातून एक गोष्ट निदर्शनास आली होती. ती म्हणजे, गाईची मान आणि तिच्या पाठीजवळील काही भागांवरून प्रेमाने हात फिरवल्यास (गोंजारल्यास) गाईला आराम मिळतो आणि तिची आपल्यासोबत चांगली मैत्री होते. जे लोक ग्रामीण भागात राहतात, त्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. ते लोक दूध काढण्यापूर्वी गाईला नेहमीच, अशा प्रकारे गोंजारत असतात.
ही थेरेपी फक्त गाईसाठीच नाही तर माणसांसाठीही फायदेशीर ठरते. बीबीसीच्या एक रिपोर्टनुसार गाईच्या संपर्कात राहिल्याने सकारात्मक उर्जा मिळते. ताण तणाव कमी होतो. तसंच शरीरातील ऑक्सिटॉक्सिनच्या हार्मोनची पातळी वाढते. याशिवाय पाळीव प्राण्याशी खेळल्याने शरीराला आणि मनाला शांत वाटतं. धोका वाढला! कोरोनामुळे उद्भवू शकतो कर्णबधिरपणा, तज्ज्ञांच्या दाव्याने वाढवली चिंता
एकटेपणात पाळीव प्राण्यांची साथ
या ट्रेंडमागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एकटेपणा दूर करणं, सोशल डिस्टेंसिंग, लॉकडाऊनमुळे जगभरातील अनेक लोक एकटेपणाचे शिकार झाले आहेत. अनेकांना मानसिक ताण तणावाचा सामना करावा लागला आहे. जगभरातील अनेक लोकांना मानसिक आजारांनी ग्रासलेले आहेत. या समस्यांवर ही थेरेपी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे. बापरे! मार्शल आर्ट्सनी डोळ्यांवर पट्टी बांधून फोडले तब्बल ४९ नारळ, पाहा थरारक व्हिडीओ