डासांना एक नुकसानकारक कीटक मानलं जातं. जे मनुष्य आणि इतर प्राण्यांचं रक्त पिऊन जिवंत राहतात. असं मानलं जातं की, केवळ मादा डासच रक्त पितात. नर रक्त पित नाहीत. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की डास तुमचं रक्त पितात आणि कुठेतरी उडून जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, डास मनुष्यांचं रक्त का पितात? त्यांना ही सवय कशी लागली?
आधी वैज्ञानिकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. पण आता त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. जी फारच हैराण करणारी आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आधी डास रक्त पित नव्हते. त्यांच्यात एका कारणामुळे हळूहळू बदल झाला.
जगभरात डासांच्या अनेक प्रजाती आहेत. यातीलच एक आहेत आफ्रिकेतील एडीस एजिप्टी डास. या डासांच्याही अनेक प्रजाती आहेत. यांच्यामुळेच झीका व्हायरस पसरतो. हाच डास डेंग्यू आणि पिवळा ताप पसरवतो. (हे पण वाचा : दिवसभरात एक व्यक्ती साधारण किती शब्द बोलतो? आयुष्यभराचा आकडा वाचून थक्क व्हाल...)
प्रिन्सटन यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी याच डासांवर रिसर्च केला होता आणि ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते की, सर्वच प्रजातींचे डास रक्त पित नाहीत. अनेक डास जिवंत राहण्यासाठी इतरही गोष्टी खातात-पितात.
प्रिन्सटन यूनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक नोआह रोज यांनी सांगितलं की, आम्ही सर्वातआधी आफ्रिकेतील काही ठिकाणांहून एडीस एजिप्टी डासांची अंडी घेतली आणि नंतर त्या अंड्यांमधून डास निघण्याची वाट बघितली. त्यानंतर आम्ही या डासांना प्रयोगशाळेत मनुष्यांवर आणि इतर जीवजंतूंवर सोडलं. जेणेकरून हे समजावं की, त्यांची रक्त पिण्याची पद्धत काय आहे. यादरम्यान आम्हाला समजलं की, एडीस एजिप्टी डासांच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या खाण्या-पिण्याच्या सवयी पूर्णपणे वेगळ्या होत्या. (हे पण वाचा : Shocking: चीनमध्ये का पिलं जातं झुरळांचं सूप आणि सरबत? कारण वाचून व्हाल हैराण...)
नोआह रोज यांनी सांगितलं की, सर्व डास रक्त पित नाहीत. ज्या ठिकाणी उष्णता जास्त असते किंवा असा परिसर जो जास्त कोरडा राहतो तिथे सामान्यपणे पाण्याची कमतरता असते. अशात डासांना प्रजननासाठी ओलाव्याची गरज असते. हीच ओलाव्याची गरज पूर्ण करण्यासाठी डास मनुष्यांचं किंवा इतर प्राण्यांचं रक्त पिणं सुरू करतात.
डासांमध्ये रक्त पिण्यावरून बदल हजारो वर्षात आला आहे. जिथे पाणी साचलेलं असतं तिथे डासांना प्रजनन करण्यास काहीच अडचण येत नाही. पण जशी त्यांना पाण्याची कमतरता जाणवते, ते मनुष्य़ांचं किंवा इतर प्राण्यांचं रक्त पिण्यास सुरूवात करतात. म्हणजे हे स्पष्ट आहे की, डास पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी रक्त पितात.