शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

आजपर्यंत का कुणीच कैलास पर्वत सर करू शकले नाही, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:33 AM

कैलास पर्वतावर कधी कुणीही चढाई न करण्यावरून अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिव राहतात आणि त्यामुळे इथे कोणतीही जिवंत व्यक्ती जाऊ शकत नाही.

हिंदू धर्मात कैलास पर्वताला फार महत्व आहे. कारण अशी मान्यता आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिवा राहतात. पण या पर्वताबाबत आणखी एक आश्चर्याची बाब आहे. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट आतापर्यंत ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी सर केलं आहे. यांची उंची ८८४८ इतकी आहे. पण कैलास पर्वत आजपर्यंत कुणी सर करू शकलं नाही. याची उंची ६६३८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्टपेक्षा ही उंची कमी असूनही कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे रहस्यच आहे.

कैलास पर्वतावर कधी कुणीही चढाई न करण्यावरून अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिव राहतात आणि त्यामुळे इथे कोणतीही जिवंत व्यक्ती जाऊ शकत नाही. असे मानले जाते की, कैलाश पर्वतावर थोडं वर चढल्यावर व्यक्ती दिशाहीन होते. दिशा कळत नसताना चढाई करणे मरणाला निमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळेच आजपर्यंत कुणी कैलास पर्वतावर चढू शकलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते की, त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता. पण या पर्वतावर राहणं अशक्य होतं. कारण इथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. त्यासोबतच कैलास पर्वतावर फार जास्त रेडिओअॅक्टिवही आहे.

त्यासोबतच असेही म्हटले जाते की, कैलास पर्वताचा स्लोप सुद्धा ६५ डिग्रीपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टचा हाच स्लोप ४०-६० असा आहे. हेच कारण आहे की, गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर सहजपणे चढाई करू शकतात, पण कैलास पर्वतावर करू शकत नाहीत.

रशियातील एक गिर्यारोहक सरगे सिस्टीयाकोव यांनी सांगितले की, 'जेव्हा मी कैलास पर्वताच्याजवळ गेलो तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडत होतं. मी त्या पर्वताच्या अगदी समोर होतो, ज्यावर आजपर्यंत कुणीही चढाई करू शकले नाहीत. पण मला अचानक कमजोरी वाटू लागली आणि माझ्या मनात विचार आला की, मी इथे थांबू नये. त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो, माझं मन हलकं होत गेलं'.

कैलास पर्वतावर चढाई करण्याचा शेवटचा प्रयत्न जवळपास  १८ वर्षांआधी म्हणजे २००१ मध्ये केला गेला होता. तेव्हा चीनने स्पेनच्या एका टीमला कैलास पर्वतावर चढाई करण्याची परवानगी दिली होती. सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसहीत जगभरातील लोकांचं मत आहे की, हे एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये.

दरम्यान, असे म्हणतात की, ९२ वर्षांआधी म्हणजेच १९२८ साली एक बौद्ध भिक्खु मिलारेपा कैलास पर्वातावर चढाई करण्यात यशस्वी ठरले होते. तसेच ते या पर्वतावर जाऊन जिवंत परत येणारे जगातले पहिले व्यक्ती होते. याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके